Snapच्या नवीन सुरक्षितता सल्लागार बोर्ड ला भेटा!

११ ऑक्टोबर २०२२

या वर्षाच्या सुरुवातीला Snapने घोषणा केली की आम्ही आमच्या सुरक्षितता सल्लागार बोर्ड (SAB) ची पुनर्रचना करणार आहोत जेणेकरून भूगोल, सुरक्षितता संबंधित विषयांच्या वैविध्याचा समावेश करण्यासाठी सदस्यत्व वाढविणे आणि विस्तार करणे हे आता आमच्या सुरक्षा सल्लागार मंडळाचे उद्दिष्ट आहे... असे करताना, आम्ही एक अप्लिकेशन प्रक्रिया जाहीर केली, ज्यामध्ये जगभरातील तज्ज्ञ आणि व्यक्तींना आमंत्रित केले, Snapला सुरक्षितता आणि सर्व गोष्टींविषयी मार्गदर्शन व दिशा देण्याबाबतचा त्यांना असलेला रस औपचारिकपणे व्यक्त करण्यासाठी.

आमच्याकडे जगभरातील व्यक्तीआणि तज्ज्ञांकडून डझनभर अर्ज प्राप्त झाले ज्यांचे मूल्यांकन आम्ही वस्तुनिष्ठ, बहुस्तरीय प्रक्रियेतून केले, ज्याची परिणती आमच्या निवड समितीतील शिफारस केलेल्या स्लेटला अधिकारी स्तरावर मंजुरी प्राप्त होण्याने झाली. या गंभीर समस्यांवर Snapचे समर्थन करण्याचे आणि सोबत काम करण्याची इच्छा दाखविल्याबद्दल आम्ही प्रत्येकाचे आभार मानतो आणि ती प्रचंड आवड आणि बांधिलकी पाहून आम्ही भारावून गेलो आहोत.

आज, आमच्या सल्लागार मंडळाची संख्या वाढून 9देशांतील 18 सदस्य जे11 वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांचे आणि प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत आहेत त्यांचा समावेश झाल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या नवीन मंडळामध्ये पारंपारिक ऑनलाइन सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या आणि संबंधित संस्थांमधून आलेले,तसेच तंत्रज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ, संशोधक आणि ऑनलाइन हानीतून टिकून राहणाऱ्या 15 व्यावसायिकांचा समावेश आहे. बाल लैंगिक शोषण आणि गैरवर्तन तसेच प्राणघातक ड्रग्ज यांसारख्या ऑनलाइन सुरक्षेतील महत्त्वाच्या जोखमी हाताळण्याचा अनुभव असलेले तसेच सुरक्षेसंबंधी विस्तृत शिस्त नियमांचा व्यापक अनुभव असलेले तज्ज्ञ या सदस्यांमध्ये आहेत. त्याचबरोबर, 3 नवीन सदस्य मंडळामध्ये सहभागी होणार आहेत, जे तरूण आहेत आणि तरुणाईचे प्रतिनिधित्व करतात. आम्ही या अर्जदारांना यासाठी निवडले आहे की संचालक मंडळाकडे सर्व महत्त्वाची "तरुणाईची मते" आणि दृष्टिकोन सहज उपलब्ध असतील हे सुनिश्चित व्हावे; मंडळातील काही भागामध्ये वचनबद्ध Snapchat वापरकर्त्यांचा समावेश आहे हे निश्चित व्हावे; आणि Snapchat समुदायातील महत्त्वाच्या लोकांकडून समतोल व्यावसायिक मते आणि व्यावहारिक दृष्टिकोन प्राप्त व्हावा.

Snap च्या नवीन सुरक्षितता सल्लागार मंडळामध्ये पुढील व्यक्तींचा समावेश आहे:

  • द डायना अवॉर्ड, यूके चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्स होम्स

  • इन्स्टिट्यूट फॉर कल्चर आणि सोसायटी, वेस्टर्न सिडनी विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया येथील प्राध्यापकीय संशोधक सदस्य अमांडा थर्ड

  • USAID च्या डिजिटल युथ कौन्सिल, हैती चे सदस्य तरूण वयाचे कॅस्ट्रा पिएरे.

  • सॉंग फॉर चार्ली, यू. एस. चे अध्यक्ष एड टेरनन

  • कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, यू.एस. येथील संगणक विज्ञानाचे प्राध्यापक हॅनी फरीद

  • यू. एस.मधील विद्यार्थी आणि अर्धवेळ तंत्रज्ञान पत्रकार तरूण वर्गातील जेकब सिडेस

  • नॅशनल ड्रग कंट्रोल पॉलिसी चे माजी संचालक जेम्स कॅरोल, जूनियर

  • लहान मुलांचे अधिकार आणि डिजिटल सिटिझनशिप, Insight2Act, यावरील आंतरराष्ट्रीय सल्लागार, नेदरलॅंड्समध्ये स्थित आणि युरोप व नॉर्थ आफ्रिका यांवर लक्ष केंद्रित करणारे जेनिस रिचर्डसन

  • eEnfance, फ्रान्स चे महासंचालक जस्टिन अटलान.

  • जर्मनीच्या स्टिफटुंग डिजिटेल चान्सेन (डिजिटल ऑपॉर्च्युनिटीज फाउंडेशन) चे संचालक मंडळाचे अध्यक्ष जुट्टा क्रोल

  • नॅशनल सेंटर ऑन सेक्श्युअल एक्सप्लॉयटेशन (NCOSE), यू. एस. चे कॉर्पोरेट व धोरणात्मक उपक्रमांचे संचालक लिना निलॉन

  • प्रोजेक्ट रॉकिट, ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक लुसी थॉमस,

  • फ्रेंड्स/ वर्ल्ड अँटी-बुलिंग फोरम, स्वीडन येथील तज्ज्ञ सल्लागार मारिया लुडबर्ग

  • द बॉस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, हार्वर्ड मेडिकल स्कूल, यू.एस. चे डिजिटल वेलनेस लॅब आणि क्लिनिक फॉर इंटरऐक्टिव्ह मिडिया व इंटरनेट डिसऑर्डर चे संस्थापक आणि संचालक, बालरोगतज्ज्ञ, मायकल रिच.

  • ओकुलाजा, रॅपर,कन्टेन्ट निर्माता, तरुणाईचे प्रतिनिधी, यूके.

  • कोलंबिया विद्यापीठ, यू.एस. चे प्राध्यापक सुधीर वेंकटेश

  • ग्रेशम कॉलेज, यूके चे माहिती तंत्रज्ञानाचे प्राध्यापक व्हिक्टोरिया बेन्स

  • DQ इन्स्टिट्यूट, सिंगापूर चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी युह्युन पार्क

तंत्रज्ञानाची कृपा आहे ज्यामुळे आपण पूर्वीपेक्षा अधिक जोडले गेलो आहोत आणि सामाजिक संवादाला चालना देण्यासाठी Snapने महत्वाची भूमिका बजावली आहे, "मायकल बेस्ट अडव्हायजर्सचे विद्यमान प्रमुख आणि व्हाइट “ड्रग झेर” चे माजी अध्यक्ष जिम कॅरोल, म्हणाले. "Snapच्या कामात त्यांच्या सल्लागार मंडळाचा भाग म्हणून मदत करण्याचा सन्मान मला प्राप्त झाला आहे, हा सातत्याने विकसित होत असलेला डिजिटल लँडस्केप त्यांच्या जगभरातील समुदायासाठी सकारात्मक आणि सुरक्षित जागा ठरेल आणि सतत प्रगती करत राहिल हे सुनिश्चित करण्यासाठी काम करणारे हे मंडळ आहे.

कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले चे संगणक विज्ञानाचे प्राध्यापक हॅनी फरीद म्हणाले, "यू.एस. मध्ये सोशल मिडियावर येणाऱ्या लहान मुलांचे सरासरी वय 13 आहे." लहान मुलांचे प्रीफ्रन्टल कॉर्टेक्स पूर्णपणे विकसित होण्यापूर्वीचे हे आणखी एक दशक असेल. ऑफलाइन जगात आपण जे करतो त्याप्रमाणे, या महाकाय ऑनलाइन प्रयोगात सहभागी होणाऱ्या लहान मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. सोशल मिडियावरील जोखमींकडे Snap किती गांभीर्याने पाहत आहे ते पाहून मला प्रोत्साहन मिळाले आहे आणि त्यांच्या (आणि प्रत्येकाच्या) सेवा सर्वांत लहान आणि असुरक्षित नागरिकांसाठी सुरक्षित ठरतील हे सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या उल्लेखनीय पथकामध्ये सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.

माझे किशोरवयीन एकमेकांशी कसे बोलतात तसे हे Snapchat आहे; ही त्यांची भाषा आहे, असे द बॉस्टन चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, हार्वर्ड मेडिकल स्कूल, यू.एस. चे डिजिटल वेलनेस लॅब आणि क्लिनिक फॉर इंटरऐक्टिव्ह मिडिया व इंटरनेट डिसऑर्डर चे संस्थापक आणि संचालक, बालरोगतज्ज्ञ, मायकल रिच म्हणाले. “व्हिज्युअल सोशल मिडियावर तरुण मुले कसे संवाद साधतात त्यामुळे त्यांच्या शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक आरोग्यावर कसा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो त्याविषयी पुराव्यावर आधारित सल्ला शोधण्याच्या Snapच्या दूरदृष्टीने मला प्रोत्साहन दिले आहे.

नवीन मंडळाची पहिली बैठक या महिन्यात प्रथमच होत आहे आणि त्यानंतर कॅलेंडर वर्षात दर तीन महिन्यांनी ते भेटतील. आमच्या प्रारंभिक बैठकीमध्ये Snapchat च्या नवीन कुटुंब केंद्राचा आढावा, तसेच 7 फेब्रुवारी रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय सुरक्षित इंटरनेट डे 2023 मधील आमच्या योगदानाचे पूर्वावलोकन यांचा समावेश असेल. मंडळाच्या सदस्यांना त्यांच्या वेेळेची भरपाई मिळत नाही, पण एखाद्या संस्थेच्या कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे समर्थन करण्याची क्षमता Snapकडे आहे, जे कार्यक्रम Snapची उद्दिष्टे साध्य करतात.

Snapच्या सुरक्षितता सल्लागार मंडळाचा भाग होणे हा सुरक्षितताविषयक प्रश्नांमध्ये सहभागी होण्याचा एकमेवर मार्ग आहे हे अर्ज करणाऱ्या प्रत्येकाला समजावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमचे नवीन पॅरेन्ट अँड केअरगिव्हर टूल फॅमिली सेंटर ज्याप्रमाणे विकसित केले आहे, त्याप्रमाणेच आमच्या सल्लागार मंडळाच्या सदस्यांना तसेच जगभरातील इतर तज्ज्ञ आणि वकिलांना आवाहन करण्याची आमची योजना आहे, सुरक्षेसंबंधी धोरणे, उत्पादनांची वैशिष्ट्ये आणि त्यांचे उपक्रम याविषयी अभिप्राय देण्यासाठी आणि मते मांडण्यासाठी. आमच्या या प्रगतीच्या आधारे Snapchat वर सुरक्षितता वाढवणे आणि आपल्या मित्रांच्या संपर्कात राहू इच्छिणारे व मजा करू इच्छिणाऱ्या किशोरवयीन आणि तरुणांना आधार देणे याविषयी आम्हाला आशा वाटते आहे.

- जॅकलीन ब्युशेर, Snap च्या प्लॅटफॉर्म सुरक्षिततेचे ग्लोबल प्रमुख

बातम्यांकडे परत