अमेरिकन फेंटॅनिल संकटाच्या विरोधात लढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत
१२ ऑक्टोबर २०२२
अमेरिकन फेंटॅनिल संकटाच्या विरोधात लढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत
१२ ऑक्टोबर २०२२
पुढील आठवड्यात Snap जाहिरात परिषदेसह अभूतपूर्व सार्वजनिक जागरूकता मोहीम सुरू करणार आहे, ज्यामुळे पालक आणि तरुण या दोन्हींना फेंटॅनिलसह बनावट गोळ्यांच्या संदर्भात शिक्षित करण्यात मदत होईल. गेल्या वर्षी fentanyl 18-45 च्या वयोगटातील U.S मधील प्रौढांसाठी मृत्यूचे कारण आणि आम्हाला माहित आहे की तरुण लोकांना विशेषत्वानेधोकाआहे. म्हणूनच आम्ही या प्रयत्नात सहयोग करण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त काळ जाहिरात परिषदेबरोबर काम केले, Snap, YouTube आणि इतर उद्योग भागीदारांना या गंभीर समस्येवर एकत्र आणण्यासाठी,
ही मोहिम आम्ही मागील 18 महिन्यांपेक्षा जास्त काळ करत असलेल्या कामावर आधारित असेल, व्हिडिओ कॅम्पेन, मूळ कन्टेन्ट आणि तज्ज्ञ संस्थांकडील संसाधनांच्या माध्यमातून थेट आमच्या प्लॅटफॉर्मवर फेन्टॅनिलच्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठीची ही मोहिम असेल. या काळात आम्ही ड्रग डीलर्सचा- असे डीलर्स जे Snapchatचा गैरवापर करतात- त्यांचा सक्रिय शोध घेऊन त्यांना काढून टाकण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुधारण्याकरिता उत्साहाने काम केले आहे आणि या डीलर्सचा न्यायनिवाडा करण्यासाठी कायदा अंमलबजावणी तपासाकरिता आमच्या मदतीमध्ये वाढ केली आहे. आम्ही आमच्या प्रगतीचे नियमित अपडेट्स देण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि पुढील आठवड्यातील मोहिमेची सुरुवात होण्याआधी, आम्ही या राष्ट्रीय साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी आमच्या चालू असलेल्या कार्याचा ताजा आढावा सामायिक करीत आहोत.
आमचा सक्रिय शोध मजबूत करणे: आम्ही आमची AI आणि मशीन लर्निंग टूल्स मजबूत करत आहोत जी आम्हाला Snapchat वर धोकादायक औषध क्रियाकलाप सक्रियपणे शोधण्यात मदत करतात. आमचे सर्वात प्रगत मॉडेल आता आम्हाला बेकायदेशीर औषध क्रियाकलापांपैकी 90% ची ओळख पटविण्यास मदत करते आहे, Snapchatter ला आमच्याकडे तक्रार करण्याची संधी मिळण्याच्या आधी, आणि Snapchatters कडून ड्रग-संबंधिततक्रारींची संख्या कमी होत असल्याचे आम्ही सातत्याने पाहत आहोत. सप्टेंबर 2021 मध्ये, Snapchatters कडून आलेल्या 23 % पेक्षा जास्त ड्रग-संबंधित तक्रारींमध्ये विशेषत्वाने विक्रीसंबंधी कन्टेन्टचा समावेश होता; सक्रिय शोध कार्याचा परिणाम म्हणून आम्ही मागील महिन्यात ते 3.3% पर्यंत कमी केले आहे. हा आकडे शक्य तितका कमी करण्यासाठी आम्ही आमचे काम सुरू ठेवणार आहे.
ड्रग डीलर्स शोधण्यासाठी सर्व प्लॅटफॉर्म्सवर काम करणे: ड्रग डीलर्स अनेक सोशल मिडिया आणि कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवर काम करतात हे माहीत असल्याने, आम्ही Snapchat चा संदर्भ देणाऱ्या या इतर प्लॅटफॉर्म्सवर अवैध ड्रग-संबंधित सामग्रीचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञांबरोबर सुद्धा काम करतो, त्यामुळे आम्ही ड्रग डीलर्सची Snapchat खाती शोधू शकतो आणि ती बंद करू शकतो. आम्हाला जेव्हा Snapchat वापरणारे ड्रग डीलर्स आढळतात, तेव्हा आम्ही त्यांच्या खात्यांवर केवळ बंदी घालत नाही तर त्यांना नवीन खाती तयार करण्यापासून रोखण्यासाठी आम्ही सक्रिय पावले उचलतो. बेकायदेशीर ड्रग-संबंधित कन्टेन्ट आणि क्रियाकलापांचे नमुने आणि संकेत सामायिक करण्यासाठी आम्ही Meta बरोबरची आमची भागीदारी सुद्धा सुरू ठेवत आहोत आणि आम्हाला आशा आहे की इतर प्लॅटफॉर्म्स या प्रयत्नात सामील होतील.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आमचा पाठिंबा वाढवणे: गेल्या वर्षभरात आम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला तरीही, आम्ही या तपासांना समर्थन देणाऱ्या आमच्या कायदा अंमलबजावणी पथकामध्ये वाढ करत राहिलो, यामध्ये अनेक पथक सदस्य फिर्यादी आणि तरुणांच्या सुरक्षेचा अनुभव असलेले कायद्याची अंमलबजावणी अधिकारी म्हणून करिअरच्या माध्यमातून आमच्याबरोबर काम करू लागले. या गुंतवणुकींमुळे आम्हाला माहितीसाठी कायद्याची अंमलबजावणी करणार्या विनंत्या पूर्ण करण्याकरिता आमचा पाठिंबा बळकट करण्यात मदत झाली आहे, ज्यांना आम्ही निकडीच्या आधारावर प्राधान्य देतो. आपातकालीन परिस्थितीतील प्रकटीकरणाच्या विनंत्यांच्या बाबतीत - ज्यामध्ये जीवाला धोका असू शकतो आणि फेन्टॅनील घटनेचा समावेश असू शकतो - आमचे 24/7 पथक सहसा 30 मिनिटांच्या आत प्रतिसाद देते. ज्यामध्ये जिवाला धोका नाही अशा विनंत्यांसाठी सुद्धा आम्ही आमच्या प्रतिसादाच्या वेळा सुधारणे सुरू ठेवले आहे.
नवीन पॅरेंटल टूल्स सादर करणे: 1आम्ही अलीकडेच फॅमिली सेंटर सादर केले आहे, आमचे पहिले इन-अॅप पॅरेंटल टूल जे पालकांना त्यांची किशोरवयीन मुले Snapchat वर संवाद साधत असलेल्या सर्व लोकांची यादी पाहण्यास सक्षम करते. एखाद्या पालकाला जर काळजी करण्यासारखे किंवा अपरिचित खाते दिसले, ज्यामध्ये त्यांना ड्रग-संबंधित क्रियाकलापांमध्ये गुंतलेले असल्याचा संशय आहे अशा खात्याचा समावेश असेल, तर ते आमच्या विश्वास आणि सुरक्षा पथकांकडे त्याची तक्रार सहज आणि गोपनीयपणे करू शकतात. आम्हाला आशा आहे की ही साधने पालकांना त्यांच्या किशोरवयीन मुलांशी ऑनलाइन सुरक्षितता आणि ते कोणाच्या संपर्कात आहेत ते जाणून घेण्याचे महत्त्व यांविषयी महत्त्वाचे संभाषण सुरू करण्यास सक्षम करतील. तुम्ही इथे साइन अप कसे करावे याबरोबरच फॅमिली सेंटरबद्दल अधिक वाचू शकता
आमची अहवाल प्रक्रिया सुव्यवस्थित करणे: 1आम्ही टप्प्यांची संख्या कमी करण्यासाठी आणि ड्रग्जच्या श्रेणीबरोबर आणखी तक्रार श्रेणींचा समावेश करण्यासाठी आमची इन-अॅप अहवाल प्रक्रिया अपडेट केली आहे, जेणेकरून Snapchatters हानिकारक कन्टेन्ट किंवा खात्यांविषयी अधिक जलद आणि अचूकपणे तक्रार करू शकतात. याशिवाय, आम्ही वर्षातून दोनदा प्रकाशित करत असलेले आमचे पारदर्शकता अहवाल सुधारण्यावर आमच्या सतत लक्ष केंद्रित करण्याचा एक भाग म्हणून, आम्ही अलीकडेच ड्रग्जची विभागणी त्यांच्या स्वत:च्या श्रेणीमध्ये करण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून आम्हाला आमच्या अंमलबजावणीच्या प्रयत्नांबद्दल अतिरिक्त तपशील देता येईल.
किशोरवयीनांंसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय प्रदान करणे:1 आम्हाला Snapchat सर्वांसाठी सुरक्षित ठेवायचे आहे, आमच्याकडे अतिरिक्त संरक्षक साधने आहेत ज्यामुळे किशोरवयीन मुलांशी त्यांच्यासाठी अपरिचित असलेल्या लोकांकडून साधला जाणे कठीण होईल. अपरिहार्यपणे, 18 वर्षांखालील Snapchattersना एकमेकांशी संवाद सुरू करण्यापूर्वी परस्पर मित्र असणे आवश्यक आहे. किशोरवयीन मुलाचे आणि अन्य वापरकर्त्याचे मित्र सारखेच असतील तर अन्य वापरकर्त्याला ते सुचविलेले मित्र म्हणून दिसू शकतात आणि आम्ही त्यांना सार्वजनिक प्रोफाइल ठेवण्याची परवानगी देत नाही.
थेट Snapchatters बरोबर जागरूकता वाढवणे:1 आम्ही ड्रग कीवर्ड आणि अपशब्दांसाठीचे शोध परिणाम अवरोधित करतो; Snapchattersने जर त्या कीवर्ड्ससाठी शोध घेतला, तर त्याऐवजी आम्ही त्यांना "हेड्स अप" नावाच्या आमच्या समर्पित अॅप-मधील पोर्टलच्या माध्यमातून तज्ज्ञ भागीदारांनी तयार केलेल्या फेन्टॅनीलच्या धोक्यांची माहिती देणाऱ्या कन्टेन्टकडे निर्देशित करतो. गेल्या वर्षभरात, आम्ही सॉन्ग फॉर चार्ली, सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC), पदार्थाचा गैरवापर आणि मानसिक आरोग्य सेवा प्रशासन (SAMHSA), कम्युनिटी अँटी-ड्रग कोलिशन्स, अमेरिका (सीएडीसीए), ट्रुथ इनिशिएटिव्ह आणि सेफ प्रोजेक्ट यांसारख्या आघाडीच्या संस्थांकडून नवीन संसाधनांचा समावेश करणे सुरू ठेवले आहे. हेड्स अप लाँच झाल्यापासून, 2.5 दशलक्ष Snapchattersना या संस्थांकडून सक्रियपणे कन्टेन्ट दिले गेले आहे. आमचा न्यूज शो, गुड लक अमेरिका, जो आमच्या डिस्कव्हर कन्टेन्ट प्लॅटफॉर्मवर दाखविला जातो त्यामध्ये, Snapchattersना fentanyl विषयी शिक्षित करण्यासाठीची एक विशेष समर्पित मालिकासुद्धा आहे, जी 900,000 पेक्षा जास्त वेळा पाहिली गेली आहे.
आमच्या सुरक्षा सल्लागार मंडळाचा विकास:1 आमच्या जागतिक समुदायाच्या अनेक भौगोलिक क्षेत्रांचे, सुरक्षा-संबंधित विषयांचे आणि कौशल्याच्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य जोडण्याच्या उद्देशाने आम्ही अलीकडेच आमच्या सुरक्षा सल्लागार मंडळाची (SAB) पुनर्रचना केली आहे. आमच्या नवीन मंडळात आता पालक आणि ड्रग्जवर मात करणाऱ्यांबरोबरच प्राणघातक औषधांसह ऑनलाइन जोखमींविषयीच्या तज्ज्ञांचा समावेश आहे. नवीन मंडळ आम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांविषयी सल्ला देईल आणि या महिन्याच्या शेवटी प्रथमच मंडळाची बैठक होईल. तुम्हाला आमच्या नवीन SAB विषयीची आणखी माहिती इथे वाचता येईल.
जसजशी अॅड कौन्सिलची मोहीम सुरू होईल, तसतसे आम्ही तज्ज्ञ संस्थांबरोबर फेन्टॅनील साथीच्या आजाराविषयी, त्याची मूळ कारणे आणि काय काळजी घ्यावी याविषयी पालकांसाठी अतिरिक्त संसाधने विकसित करण्याचे आमचे काम सुरू ठेवू. आणि आम्ही Snapchat वर तसेच संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्ये या संकटाशी लढण्यासाठी आमचे ऑपरेशनल आणि शैक्षणिक कार्य दोन्ही तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत.