Snap Values

सरकारी विनंत्या आणि बौद्धिक मालमत्ता काढून टाकण्याच्या विनंत्या 

सरकारी विनंत्या आणि कॉपीराइट केलेला मजकूर काढण्‍याच्‍या सूचना (DMCA)

1 जुलै 2023 - डिसेंबर 2023

Snapchatला अधिक सुरक्षित करण्यासाठी आमच्या कार्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे तपासात उपयुक्त माहितीच्‍या वैध विनंत्‍या पूर्ण करून कायद्याची अंमलबजावणी करणे आणि सरकारी संस्थांबरोबर काम करणे. जीवनाला धोका किंवा शारीरिक हानी पोहोचवू शकणाऱ्या कोणत्याही समग्रीला सक्रियपणे प्रतिबंध करण्यासाठी आम्ही काम करतो.

Snapchat वरील बहुतेक मजकूर पूर्व नियोजित पद्धतीने काढून टाकला जात असताना, आम्ही लागू कायद्यानुसार सरकारी संस्थांना खाते माहिती जतन आणि प्रदान करण्यासाठी कार्य करतो. एकदा आम्हाला Snapchatचे खाते रेकॉर्ड करण्यासाठी कायदेशीर विनंतीची वैधता प्राप्त होऊन ती रूढ झाली की— विनंती कोणत्याही अवैध मार्गाने न होता ती कायद्याची कायदेशीर अंमलबजावणी करणाऱ्या एखाद्या संस्थेकडून किंवा सरकारी एजन्सी कडून होते आहे याची पडताळणी करणे महत्वाचे आहे — आम्ही लागू होणाऱ्या कायदा आणि गोपनीयतेच्या असणाऱ्या आवश्यकता पाळून प्रतिसाद देतो.

खालील चार्ट्स मध्ये कायद्याच्या अंबलबजावणी आणि सरकारी एजन्सीच्या अश्या विनंत्या आहेत ज्याचे आम्ही समर्थन करतो ज्यामध्ये न्यायालयासमोर हजर राहण्याचा हुकूम आणि समन्स, न्यायालयाचे आदेश, तपासणी परवाना आणि आपत्कालीन प्रकटीकरण/प्रकटन विनंत्या यांचा समावेश आहे.

तसेच ज्या विनंत्यांसाठी काही डेटा तयार केला होता त्याची टक्केवारी प्रकाशन तरखेनुसार पहिली जाते, ती अहवाल कालावधीत प्राप्त झालेल्या विनंत्यांवर आधारित असते. क्वचित परिस्थितीत जिथे विनंतीमध्ये कमतरता असल्याचे निर्धारित केले गेले होते - Snap ने डेटा तयार केला नव्हता - आणि कायद्याच्या अंमलबजावणी नंतर पारदर्शकता अहवालाच्या प्रकाशनानंतर सुधारित, वैध विनंती सादर केली आहे, तेंव्हा डेटाचे नंतर उत्पादन मूळ किंवा नंतरच्या अहवाल कालावधीमध्ये प्रतिबिंबित होणार नाही.

युनायटेड स्टेट्सच्या सरकारी माहिती संदर्भातील विनंत्या

यू.एस.च्या सरकारी संस्थांमधील वापरकर्त्यांच्या माहिती संदर्भातील विनंत्या.

आंतरराष्ट्रीय सरकारी माहिती विनंत्या

युनायटेड स्टेट्सच्या बाहेरच्या सरकारी संस्थांमधील वापरकर्ता माहितीसाठी विनंत्या.

* “खाते आयडेंटीफायर” वापरकर्त्याच्या माहितीची विनंती करताना कायदेशीर प्रक्रियेत कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे निर्दिष्ट केलेल्या एका खात्याशी संबंधित ओळखकर्त्यांची संख्या (उदा. वापरकर्तानाव, ईमेल पत्ता आणि फोन नंबर) दर्शवते. काही कायदेशीर प्रक्रियामध्ये एकाहून अधिक अभिज्ञापक असू शकतो. काही उदाहरणांमध्ये, अनेक अभिज्ञापक हे एक खाते ओळखू शकतात. ज्या उदाहरणांमध्ये जेथे एक अभिज्ञापक अनेक विनंत्यांमध्ये निर्दिष्ट केला गेला असेल, त्यामध्ये प्रत्येक उदाहरण समाविष्ट केले जाते.

** Snap ला US-UK डेटा प्रवेश करारानुसार (जे 3 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहे) यूकेकडून इन्व्हेस्टिगेटरी पॉवर्स ऍक्ट अंतर्गत विनंत्या प्राप्त आहेत त्या प्रमाणात अशा कोणत्याही विनंत्यांवर त्या कायद्याच्या लागू आवश्यकतेनुसार विलंब होईल. अधिक माहितीसाठी, कृपया पहा: https://www.ipco.org.uk/publications/annual-reports/.

युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय सुरक्षा संबंधित विनंत्या

यू. एस.च्या राष्ट्रीय सुरक्षेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार वापरकर्त्याच्या माहिती संदर्भातील विनंत्या. खालील बाबींमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पत्र (NSLs) आणि परदेशी माहिती देखरेख (FISA) न्यायालय आदेश/दिशानिर्देश/निर्देशांचे आहे.

सरकारी मजकूर काढून टाकण्याच्या विनंत्या

आमच्या सेवा अटी आणि कम्युनिटी मार्गदर्शक तत्वेअंतर्गत ही श्रेणी अनुज्ञेय असलेला कंटेंट काढून टाकण्यासाठी सरकारी घटकाने केलेल्या मागण्या ओळखते.

टीप: शासकीय कार्यालयाकडून विनंती केल्यावर, जेव्हा आम्ही आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा मजकूर काढतो तसे आम्ही औपचारिकपणे त्यावर पाळत ठेवत नाही, आमच्या मते ही खूपच दुर्मिळ घटना आहे. आम्हाला जेव्हा वाटते की मजकुराला प्रतिबंधित करणे गरजेचे आहे, जो एका ठराविक देशात बेकायदेशीर ठरवला गेला आहे, जो नाहीतर आमच्या धोरणांचे उल्लंघन करत नाही,जागतिकरीत्या काढण्याच्या ऐवजी, आम्ही भौगोलिकरीत्या त्याचा ऍक्सेस प्रतिबंधित करतो.

अतिरिक्त टीप म्हणून, आमच्या टीमने डिजिटल सेवा कायद्यांतर्गत उघड करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती ट्रॅक करण्यासाठी आमचे सरकारी टेकडाउन ऑपरेशन्स अधिक सुधारण्यास सुरुवात केली आहे. भविष्यातील अहवालांमध्ये, आम्ही या श्रेणीमध्ये नवीन डेटा पॉइंट सुरू करणार आहोत.

कॉपीराइट उल्लंघनाच्या सूचना

ही श्रेणी कॉपीराइट उल्लंघन करणारी सामग्री काढून टाकण्यासाठी कोणतीही वैध विनंती दर्शविते.