Snapchatवर मानसिक आरोग्य आणि गुंडगिरी विरुद्ध लढ्याचे समर्थन
६ ऑक्टोबर २०२२
Snapchatवर मानसिक आरोग्य आणि गुंडगिरी विरुद्ध लढ्याचे समर्थन
६ ऑक्टोबर २०२२
Snapमध्ये आमच्या समुदायाचे आरोग्य आणि कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जगभरातील तरुण लोक त्यांच्या मानसिक आरोग्याशी संघर्ष करत असताना, आमच्याकडे Snapchatters साठी त्यांच्या मित्रांशी संवाद साधण्यासाठी सुरक्षित जागा राखून आणि त्यांना अत्यावश्यक संंसाधने उपलब्ध करून देऊन त्यांना मदत करण्याची जबाबदारी आणि अर्थपूर्ण संधी दोन्ही आमच्याकडे आहे.
सुरुवातीपासूनच, Snapchat ची रचना खऱ्या मित्रांना लाईक्स आणि टिप्पण्यांच्या दबावाशिवाय संवाद साधण्यात आणि एकत्र मजा करण्यासाठी मदत करण्यासाठी केली गेली होती – पारंपारिक सोशल मीडियाची अत्यंत घातक वैशिष्ट्ये टाळून जी सामाजिक तुलना करण्यास प्रोत्साहन देतात आणि मानसिक आरोग्यासाठी त्रासदायक असू शकतात. आम्हाला माहीत आहे की मानसिक आरोग्याच्या समस्यांशी निगडित तरुण लोकांसाठी मित्रांमधील संबंध हेदेखील मदतीचा एक महत्त्वपूर्ण प्रकार आहेत - आपापला संघर्ष सुरू असताना सहसा मित्रांशी सर्वांत आधी संपर्क साधला जातो. खऱ्या मित्रांमधील संवादासाठी तयार केलेले प्लॅटफॉर्म म्हणून, तिथेच आपण विशेषत्वाने - आणि अनन्यपणे - मदत करण्याच्या स्थितीत आहोत आणि गुंडगिरीला प्रतिबंध करण्यात, आपला समुदाय गुंडगिरीला कसा प्रतिसाद देऊ शकतो त्याविषयी शिक्षित करण्यात आणि त्यांना किंवा मित्रांना गरज असेल तेव्हा त्यांना वापरता येतील अशी संसाधने सादर करण्यासाठी सशक्त भूमिका बजावू शकतात.
या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त, आम्ही जगभरात गुंडगिरी प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य मोहिमांचा एक संच सुरू करत आहोत. स्थानिक तज्ज्ञ संस्थांबरोबरच्या भागीदारीच्या माध्यमातून या मोहिमा , Snapchattersना एकमेकांशी दयाळूपणे वागण्यास प्रोत्साहित करतील आणि गुंडगिरी किंवा मानसिक आरोग्याच्या संघर्षांना सामोरे गेल्यास ते स्वीकारू शकतील अशी स्थानिक साधने उपलब्ध करून देतील.
Snapchatters च्या मानसिक आरोग्यासाठी आम्ही मदत करण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे आमच्या “Here For You” नावाच्या अॅपमधील पोर्टल 2020 मध्ये सादर केलेले, Here For You हे अनेक प्रकारच्या मानसिक आरोग्याशी संबंधित विषयांचा शोध घेत असलेल्या आणि मानसिक आरोग्याच्या किंवा भावनिक संकटात असलेल्याSnapchatters ना तज्ज्ञ संस्थांकडील संसाधने सादर करून इन-अॅप सक्रिय मदत पुरवते, ·आज, आम्ही Here For You चा जगभरात विस्तार करत असल्याची घोषणा करत आहोत:1
U.S.मधील आत्महत्या आणि संकटाविषयीच्या नवीन 9-8-8 लाइफलाइनबाबत जागरुकता वाढवणारे कन्टेन्ट
राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंध हॉटलाइनविषयी जागरूकता वाढविण्यावर लक्ष केंद्रित केलेल्या नवीन भागासाठी फ्रान्समध्ये 3114 बरोबर भागीदारी केली.
जर्मनीमध्ये Here for you सादर करत आहे आणि नैराश्य, तणाव व इतर अनेक विषयांचा समावेश असलेले कस्टम व्हिडिओ कन्टेन्ट विकसित करण्यासाठी ich bin alles सह भागीदारी करत आहे.
नेदरलँड्समधील Stichting 113 Zelfmoordpreventie बरोबर विकसित केलेले नवीन कन्टेन्ट (आत्महत्या प्रतिबंध) त्यांच्या आत्महत्येसंबंधी हॉटलाइनविषयी जागरूकता पसरवते आणि गुंडगिरी कशी हाताळायची त्यावर लक्ष केंद्रित करते.
हेडस्पेस नॅशनल युथ मेंटल हेल्थ फाऊंडेशन आणि ऑस्ट्रेलियातील रीचआउट यांच्याबरोबर भागीदारीत नवीन कन्टेन्ट ज्यामध्ये एक चांगला मित्र असणे, तणावाचा सामना करणे आणि निरोगी हेडस्पेस राखणे यासारख्या विषयांचा समावेश आहे.
चिंता हाताळणे, नैराश्याला सामोरे जाणे आणि आत्महत्येच्या विचारांना सामोरे जाणाऱ्या मित्राला पाठिंबा देणे यांसह मानसिक आरोग्याच्या विविध विषयांचा समावेश करून भारतात नवीन कन्टेन्ट आणण्यासाठी संगथ बरोबर जोडले जाणे.
दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबर भागीदारी करून सौदी अरेबियामध्ये Here for you सादर करत आहे आणि गुंडगिरीला कसा प्रतिसाद द्यावा यासाठी टिपा देत आहे.
यू.एस.मधील क्लब युनिटीच्या आमच्या द्वितीय श्रेणीचा परिचय करून देत आहोत आणि Snapchatters ना त्यांच्या मित्रांशी मानसिक आरोग्याविषयी बोलण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय लेन्स व फिल्टरवरील जाहिरात परिषदेच्या “सेझ द अकवर्ड” मोहिमेसोबत भागीदारी करत आहोत.
Here For You चा विस्तार करण्याव्यतिरिक्त आणि क्लब युनिटी अपडेट करण्याबरोबरच, आम्ही आमच्या समुदायामध्ये राष्ट्रीय फिल्टर, लेन्स आणि स्टिकर्सद्वारे ऑन-द-ग्राउंड समर्थन आणि संसाधनांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी विश्वासार्ह स्थानिक भागीदारांबरोबर काम करत आहोत:
कॅनडा मध्ये, आम्ही लेन्स आणि फिल्टरद्वारे त्यांच्या मानसिक आरोग्य संसाधनांचा प्रचार करण्यासाठी किड्स हेल्प फोनसोबत काम करत आहोत आणि Snapchatters ना गरज असताना मदत घेण्यास प्रोत्साहित करत आहोत.
एका फिल्टरच्या माध्यमातून आत्महत्या प्रतिबंध हॉटलाइनविषयी जागरूकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय फिल्टरवर फ्रान्समध्ये 3114 बरोबर भागीदारी केली. आम्ही E-Enfance बरोबर गुंडगिरी प्रतिबंधक मोहिमेवर सुद्धा भागीदारी करणार आहोत जी त्यांच्या डिजिटल वेलबिइंग हॉटलाइनला हायलाइट करते.
जर्मनीमध्ये, आम्ही ich bin alles बरोबर एका लेन्सवर सुद्धा काम करत आहोत जे आपल्या मानसिक आरोग्याशी झुंजत असलेल्या मित्राला कशी मदत करावी याविषयी टिपा देते.
नेदरलँड्समध्ये, ज्यांना आत्महत्येचा विचार करावासा वाटतो त्यांना गंभीर संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही 113 बरोबर एका लेन्सवर काम करत आहोत.
नॉर्वेमध्ये, आम्ही Verdensdagen for Psykisk Helse या राष्ट्रीय मानसिक आरोग्य जागरुकता मोहिमेला एका लेन्स व फिल्टरसह समर्थन देत आहोत आणि Mental Helse बरोबर भागीदारी करत आहोत जेणेकरून राष्ट्रीय मानसिक आरोग्य हॉटलाइनला फिल्टरसोबत प्रोत्साहन दिले जाईल.
Snapchatters ला लेन्स, फिल्टर आणि स्टिकर्सच्या मदतीने गुंडगिरीला प्रतिसाद देण्यासाठी रणनीती देण्यात मदत करण्यासाठी ऑस्ट्रेलियामध्ये PROJECT ROCK IT बरोबर भागीदारी.
Snapchat वापरणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित आणि सकारात्मक अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे. खऱ्या मित्रांना अस्सल मार्गाने संवाद साधण्यास मदत करण्यासाठी रचना केलेले एक व्यासपीठ म्हणून, Snapchatters एकमेकांशी जोडले जाण्यासाठी आणि त्यांच्या मानसिक आरोग्याला आधार देण्याकरिता आयुष्य वाचविणारी संसाधने उपलब्ध करून देण्यासाठीचे एक साधन असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही जाणतो की बरेच काही करण्यासारखे बाकी आहे आणि गरजू Snapchatters ना मदत करण्यासाठी तसेच आमच्या समुदायाच्या सर्वांगीण कल्याणासाठी ही नवीन साधने, संसाधने आणि भागीदारी तयार करण्याकरिता आम्ही काम करत राहू.