Snap Values

Snapchat, गोपनीयता आणि सुरक्षितता: मूलभूत गोष्टी

२१ एप्रिल २०२१

सुरक्षितता आणि प्रभाव ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे! मी जेन स्टाउट, सार्वजनिक धोरणाची व्हीपी आहे आणि आजच्या या पोस्टसह इव्हानच्या परिचयाचे अनुसरण करताना मला आनंद झाला आहे, जो आमच्या दृष्टीकोनातून जात आहे.

कारण Snapchat हे मूलतः एक वेगळ्या प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे, आम्ही मानतो की, तुम्ही त्याचा वापर केला नाही किंवा तुम्ही त्याचा वापर करण्याची तुमची योजना नाही हे जाणून घेणे अत्यंत कठीण आहे (जे ठीक आहे!). आम्हाला आशा आहे की, हा ब्लॉग अशा व्यक्तींना उपयोगी ठरू शकतो ज्यांना जाणून घ्यायचे आहे की तरूण लोकांचा आमच्या उत्पादनासंबंधी काय अनुभव आहे, किंवा अनेक भागीदार किंवा अधिवक्ता ज्यांना सुरक्षा आणि विश्वास यासंदर्भातील अत्यंत गंभीर विषयांना समजून घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा ब्लॉक अत्यंत उपयोगी आहे.

आमच्या Snapchat समुदायाच्या सुरक्षिततेपेक्षा आम्हाला कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही, आणि आम्हाला हा विश्वास आहे की आपल्या समुदायाला आमची उत्पादने वापरताना त्यांची सुरक्षा, गोपनीयता आणि चांगला अनुभव यांचे संरक्षण कसे करावे यासंदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत. आत्तापर्यंत आम्ही हेच दोन गोष्टींच्या मार्फत म्हणजे ऑनलाइन स्त्रोत आणि ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केलेले प्रयत्नांनी साध्य केली, आणि आता वर्षाच्या सुरुवातीला आम्ही विस्तृत डिजिटल साक्षरता अभियान चालवून या प्रयत्नांना दुप्पट बळ देणार आहोत. आम्हीच स्नॅपचॅटर्सवर उच्च दर्जाचे लक्ष केंद्रित करून, आणि आम्ही त्यांच्या मदतीच्या व्यक्तींशी: जसे पालक, कुटुंबातील सदस्य, आदर्श व्यक्ती आणि त्यांच्या आयुष्यात त्यांची अत्यंत काळजी घेणाऱ्या लोकांशी बोलून त्यांना मदत करू.

सुरु करण्यासाठी, आम्ही पारंपारिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या तुलनेत Snapchatला विशेष प्रकारे लक्ष केंद्रित करून वेगळ्या पद्धतीने डिझाईन केले आहे. जसे इव्हान यांनी सांगितले, आम्हाला वास्तव मैत्री एका सकारात्मक, सुरक्षित आणि मजेदार वातावरणात तयार करून त्या मैत्रीला वाढविण्यासाठी आम्हाला आमची उत्पादने डिझाईन करायची आणि तंत्रज्ञान विकसित करायचे आहेत, आणि हे आमचे ध्येय आहे. हे आमचे ध्येय आम्हाला आमचा प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने डिझाईन करायचा व कार्यरत करायचा आणि नवीन उत्पादने विकसित करण्यासाठीचा निर्णय घेण्यासाठी, आम्ही भविष्याविषयी काय विचार करतो आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आमची भूमिका काय असेल यासाठी हे आम्हाला मदत करतात.

Snapchat ची वास्तुकला

  • आम्ही अशा उत्पादन विकास प्रक्रियेचा अवलंब करतो ज्यामध्ये गोपनीयता, सुरक्षा आणि नीतिमत्ता लक्षात घेऊन कोणत्याही नवीन वैशिष्ट्यांचा डिझाईन प्रक्रियेमध्ये समावेश करतो -- प्रदीर्घ विशेष आढावा न घेता आम्ही आमचे कोणतेही उत्पादन सादर करत नाही.

  • आमच्याकडे कोणताही मुक्त न्यूज फीड नाही, जेथे कोणीही अप्रमाणित असलेली माहिती सर्व जगाला प्रसारित करू शकतो. खरेतर, ज्यावेळी सर्वात प्रथम आपण ॲप वापरतात त्यावेळी Snapchat तुम्हाला वेगळे वाटते कारण ॲप कॅमेरा उघडते -- विशेषतः कोरा कॅनव्हास -- येथे कोणताही फीड जो तुम्ही स्क्रोल करू शकतात तो उघडत नाही.

  • आम्ही Snapchat वर कोणतीही अप्रमाणित मजकूर 'गो व्हायरल' होऊ देत नाही. आमचा कंटेंट प्लॅटफॉर्म, डिस्‍कवरमध्ये केवळ तपासून घेतलेले मिडिया प्रकाशक आणि कन्टेन्ट निर्मात्यांच्या कन्टेन्टचा समावेश केला जातो. आमचा मनोरंजन प्लॅटफॉर्म, स्पॉटलाईट, हा पूर्वलक्षी प्रभावाने मानवी आढावा घेऊन मजकूर मोठ्या प्रमाणावरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी नियंत्रित करतो.

  • Snapchatवर, ग्रुप चॅट्स मर्यादित संखेमध्ये आहेत. जे प्लॅटफॉर्मचे आधीपासून चे सदस्य नाहीत अशा व्यक्तींना हे गृप्स आमच्या प्लॅटफॉर्मवर शोधता येत नाही. फक्त १: १ चॅट करत असतांना, तुम्ही ग्रुपमधील कोणासोबत आधीच मित्र नसतांना तुम्ही ग्रुप चॅटमध्ये सामील होऊ शकत नाही.

सुरक्षितता आणि गोपनीयता

  • Snapchat वर सार्वजनिक टिप्पणी करणारे आणि प्रोफाइल फोटो ब्राउझ करता येण्यासारखी सुविधा उपलब्ध नाही -- आम्ही जाणूनबुजून अनोळखी व्यक्तींना अॅपवर नसलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे अधिक कठीण बनवतो. विशेषतः १८ वर्षाखालील स्नॅपचॅटर्स सुरक्षित ठेवण्यासाठी, आम्ही त्यांना सार्वजनिक प्रोफाइल, तयार करणे यासाठी परवानगी देत नाही, आणि स्नॅपवर नवीन मित्र मैत्रिणी शोधत असताना वापरकर्त्यांचा सध्याचा फोटो न दाखवता बीटमोजी अवतार दाखवला जातो. 

  • इतर वापरकर्त्याला संदेश पाठवण्यासाठी तुम्हाला अनिवार्यपणे आणि प्रत्येक वेळी टू वे कॉन्टॅक्ट प्रमाणीकरणची आवश्यकता असते, कारण आम्हाला विश्वास आहे की मैत्री ही परस्पर आणि सुरक्षित असावी. येथे केवळ एक व्यक्ती इतर व्यक्तीला फॉलो करत नाही, किंवा कोणताही अनोळखी व्यक्ती तुमच्या परवानगी किंवा आमंत्रणाशिवाय तुमच्या आयुष्यात येऊ शकत नाही. हेसुद्धा सत्य आहे की Snapchat च्या इतर वैशिष्ट्यांमुळे जसे स्नॅप मॅप मुळे -- तुम्ही जोपर्यंत एकमेकांचे मित्र होत नाही आणि तुम्ही तुमच्या इच्छेने तुमचे लोकेशन सामाईक करण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत कोणालाही मॅपवर पाहू शकत नाही.

  • आमच्या ॲपची वैशिष्ट्ये अनिवार्यपणे वैयक्तिक स्वरुपात असावी यासाठी आम्ही आमचे लक्ष केंद्रित करतो, कारण खऱ्या आयुष्यामध्ये, वापरकर्त्याने स्वतःची कोणती माहिती कोणत्या वेळी जाहीर करावी हे त्या वापरकर्त्याने निवडावे याचा विचार आम्ही करतो. उदाहरणार्थ, ज्यावेळी वापर करता आमचे स्नॅप मॅप हे वैशिष्ट्य सर्वप्रथम वापरतो त्या वेळी पूर्वलक्षी नियमाने स्थान शेअरिंग बंद असते. त्यांना त्यांच्या मित्र-मैत्रिणींना सामाईक करण्याचा पर्याय ठरवण्याचा अधिकार आहे -- पण अनोळखी लोकांसोबत ते सामायिक करू शकत नाहीत.

  • आम्ही आमची उत्पादने विकसित करताना हे ध्येय ठेवतो की, आम्हाला आमच्या वापरकर्त्यांची कमीत कमी माहिती संकलित करावी लागेल आणि त्यांची माहिती कमी कालावधीसाठी आमच्याकडे संकलित केली जाईल - कारण जाहिरात करताना आम्हाला आमच्या सेवा निशुल्क देणे आवश्यक आहे, आम्हाला विश्वास आहे की आम्ही आमच्या व्यवसायिक भागीदारांना योग्य महत्त्व देऊन लोकांच्या मित्रत्वाच्या गोपनीयतेचा आदर करू आणि लोकांची नाती ही एका वस्तूप्रमाणे न समजता त्याला योग्य तो मान देऊ, या विरुद्धचे आचरण आम्ही लोकांना कधीही अनुभव देणार नाही.

  • वापरकर्त्यांना काळजी वाटणारा आणि समस्या वाटणारा मजकूर आमच्याकडे जलद आणि सहज पद्धती अ‍ॅप-टूल्स द्वारे तक्रार करण्यात यावा यासाठी आम्ही सुविधा दिली आहे, जेणेकरून आमची कार्यतत्पर असलेली सुरक्षितता आणि विश्वास टीम तपास करून त्यावर कारवाई करू शकेल.

आमची दिशानिर्देश आणि अंमलबजावणी

  • प्रथम दिवसापासून, आम्ही हानिकारक मजकूर पसरविणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन रक्कम देणे टाळण्यासाठी Snapchatची रचना केली आहे. आमची सामुदायिक दिशानिर्देश द्वेषपूर्ण संभाषण, छळवणूक आणि चुकीची माहिती पसरविणे यामुळे इजा होणे, कटकारस्थाने, खोटे वैद्यकीय दावे आणि नागरी अधिकार कमी करण्याच्या कृतींना प्रतिबंध करतात. 

  • आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर कोणत्याही स्वरूपात मान्य करत नाही आणि आमची दिशानिर्देश तयार करण्यासाठी आणि सक्तीने अमलात आणण्यासाठी आमच्याकडे सक्षम यंत्रणा आहे. एका पद्धतीने आम्ही ही गोष्ट सहज आणि सोपी करतो: ज्यावेळी एखादा मजकूर जो आमच्या धोरणांचे उल्लंघन करतो, अशा मजकुराला आम्ही सहजतेने काढून टाकतो. आम्ही कोणत्याही आक्षेपार्ह मजकुराला लेबल लावत नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला आमच्या नियमातून सूट देत नाही -- सर्व स्नॅपचॅटर्सना आमचे नियम एकसमान पद्धतीने लागू होतात.

  • जर उल्लंघन करणाऱ्या मजकुरामध्ये अल्पवयीन मुलांची सुरक्षितता धोक्यात येत असेल तर आम्ही ही बाब हरवलेल्या आणि शोषित मुलांच्या राष्ट्रीय केंद्रामध्ये म्हणजे नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अ‍ॅण्ड एक्सप्लॉईटेड चिल्ड्रन (एनसीएमईसी) यांच्याकडे तक्रार करतो आणि त्यांच्यासोबत व सहाय्यकारी कायदा अंमलबजावणी संस्थांसोबत काम करण्यासाठी आमच्याकडे विशिष्ट प्रक्रिया अस्तित्वात आहे.

हे आम्हाला परिपूर्ण बनवत नाही आणि असा प्रसार करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपमध्ये गैरवर्तन होण्याची शक्यता आहे. Snapchatची सुरक्षितता अधिक सुधारण्यासाठी आणि राखण्यासाठी आम्ही आमच्याकडील यंत्रणा आमचे धोरण सातत्याने विकसित करत आहोत. आम्ही जोखीम संबंधात नेहमी विचार करतो आणि आमच्या समुदायाला अधिक चांगल्या रीतीने सुरक्षा प्रदान करण्यासाठी आम्ही आमच्या तांत्रिक क्षमता आणि त्यासंदर्भातील काम अधिक विकसित करत आहोत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आणि वाईट घटकांपेक्षा एक एक पाऊल पुढे राहण्यासाठी, आम्ही सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षितता तज्ञ यांचेकडून मार्गदर्शन घेतो. या ब्लॉगवर असलेल्या अनेक विषयांना सखोल पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण योजना करू, जेणेकरून तुम्हाला आम्ही आपल्या समस्यांना कशा पद्धतीने जाणून घेतो आणि त्यांचे निराकरण करतो हे समजेल.

एक पालक म्हणून, मी माझ्या स्वतःच्या मुलांसोबत संवाद करण्यासाठी भरपूर वेळ घालवतो, माझ्या मित्रांच्या मुलांच्या जीवनामध्ये तंत्रज्ञान आणि प्लॅटफॉर्मच्या भूमिकेसोबत जुळवून घेत, आम्ही स्नॅपमधील आमच्या कामाचा भाग म्हणून अनेक भागधारकांची बोलतो. मी आशा करतो की काही मुलभूत गोष्टी आपल्याला समजल्या असतील, आणि पालकांना व कुटुंबातील सदस्यांना आमची उत्पादने, अतिरिक्त स्त्रोत जी आमच्या स्नॅपचॅटर्सना सुदृढ रीतीने, सुरक्षित आणि एका मजेदार वातावरण निर्मिती करण्यासाठीची विस्तृत माहिती आमच्या जोडली आहे पालक मार्गदर्शक तत्त्वेमध्ये जोडली आहे. 


जेन

बातम्यांकडे परत