सुरक्षित इंटरनेट डे २०२२ : तुमचा अहवाल महत्त्वाचा आहे!
८ फेब्रुवारी २०२२
सुरक्षित इंटरनेट डे २०२२ : तुमचा अहवाल महत्त्वाचा आहे!
८ फेब्रुवारी २०२२
आज आंतरराष्ट्रीय सुरक्षित इंटरनेट दिवस (SID) आहे, प्रत्येकासाठी, विशेषत: लहानग्यांसाठी इंटरनेट सुरक्षित आणि सुदृढ करण्यासाठी यासाठी हा जगभरातील एकत्र येणार्या लोकांना समर्पित असलेला वार्षिक कार्यक्रम आहे. SID 2022 ला सुरक्षित इंटरनेट दिवस सोहळ्याला सलग 19 वर्षे झाली, आणि जग पुन्हा "उत्तम इंटरनेटसाठी एकमेकांसोबत" या संकल्पनेभोवती एकत्र येत आहे.
Snapchat वर तुम्हाला असे काहीतरी दिसते जे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्याविषयी आम्हाला समजण्याचे फायदे आणि महत्त्व ठळकपणे मांडण्याची ही संधी आम्ही स्नॅपवर घेत आहोत. Snapchat हे जवळच्या मित्रमैत्रिणींंबरोबर गप्पाटप्पा करण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आहे, आणि आम्हाला असे वाटते की स्नॅप्स आणि चॅट्स पाठवताना प्रत्येकाला सुरक्षित, खात्रीपूर्ण आणि निवांत वाटावे. तरीही असे घडू शकते की लोक असे काहीतरी कन्टेन्ट पाठवतील किंवा अशाप्रकारे वर्तन करतील जे आमच्या समुदायासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांना छेद देणारे असेल.
ऑनलाइन असताना सुरक्षित राहण्याचा प्रश्न येतो तेव्हा, प्रत्येकाने एक भूमिका पार पाडायची असते, आणि आम्हाला असे वाटते की त्रासदायक आणि नुकसानकारक कन्टेन्ट व वर्तनाची तक्रार करण्याविषयी सर्व स्नॅपचॅटर्सना माहिती असावी- जेणेकरून आम्हाला त्याची दखल घेता येईल- त्यामुळे प्रत्येकाचा सामुदायिक अनुभव आणखी चांगला होतो. किंबहुना, स्नॅपचॅटर्स करू शकत असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टींपैकी हे एक आहे ज्यामुळे वाईट कृती करणारे आणि नुकसानकारक कन्टेन्टपासून हा प्लॅटफॉर्म दूर ठेवण्यास मदत होऊ शकेल.
तक्रार करण्याबाबतची नाखुषी
संशोधनातून असे आढळते की तरुणाई विविध कारणांमुळे कन्टेन्ट किंवा वर्तनाविषयीची तक्रार करण्यास इच्छुक नाही. यामध्ये काही सामाजिक गतिविज्ञान असू शकते, पण आमच्याशी संपर्क साधून वाटणारा निश्चिंतपणा वाढावा म्हणून, काही विशिष्ट धारणांमधील खोटेपणा उघड करण्याचे कामही प्लॅटफॉर्म्स उत्तमप्रकारे करू शकतात. उदाहरणार्थ, नोव्हेंबर 2021 मध्ये आम्हाला समजले की सोशल मिडियावरील वाईट वर्तनावर काही कारवाई केली तर आपली मित्रमंडळी काय म्हणतील अशी काळजी एक तृतियांशपेक्षा जास्त तरुणाईला वाटते. याबरोबरच, जवळजवळ चारपैकी (39%) एकाने सांगितले की त्यांच्याशी वैयक्तिक ओळख असलेली एखादी व्यक्ती वाईट वागते तेव्हा त्यावर कृती न करण्याचा तणाव त्यांना जाणवतो. हे निष्कर्ष हॅरिस इनसाइट्स अँड अनालिटिक्स यांनी ऑनलाइन सेफ्टी इन्स्टिट्यूट (FOSI) साठी आयोजित केलेल्या मॅनेजिंग द नॅरेटिव्ह: यंग पीपल्स युज ऑफ सेफ्टी टूल्स या उपक्रमातून आले आहेत.
FOSI संशोधनात अमेरिकेतील 13 ते17 वयाची किशोरवयीन मुले आणि 18 ते 24 वयातील तरूण मुलांच्या विविध गटांची मते नोंदविली. संख्यात्मक घटकांंबरोबरच या सर्वेक्षणामध्ये तक्रारी करणे आणि इतर विषयांवरही सहभागींची सर्वसाधारण मते घेतली गेली. एका 18 वर्षीय व्यक्तीने केलेल्या एका टिप्पणीतून असंख्य तरूणांचा दृष्टिकोन थोडक्यात स्पष्ट झाला, "माझ्या मते मला असे नाही वाटले की तो गुन्हा तक्रार करण्याइतका पुरेसा होता."
Snapchat वर तक्रार करण्यासंबंधीची जलद तथ्ये
FOSI निष्कर्ष प्लॅटफॉर्मवर तक्रार करणे आणि सेवांविषयीच्या शक्य असलेल्या गैरसमजांबाबतच्या महत्त्वाविषयी सांगतात. Snapchatters साठी, आम्हाला आमच्या वर्तमान तक्रार पद्धती व प्रक्रियांविषयीची मोजकी जलद तथ्ये स्पष्ट करण्यास मदत होईल अशी आशा आहे.
काय तक्रार करावी: Snapchat च्या संभाषणांमध्ये आणि स्टोरीज भागात, तुम्ही फोटो, व्हिडिओ आणि खात्यांची तक्रार करू शकता; अधिक सार्वजनिक ठिकाणी डिस्कव्हर आणि स्पॉटलाइट विभागांमध्ये, तुम्ही कन्टेन्टची तक्रार करू शकता.
कशी तक्रार करावी: फोटो आणि व्हिडिओंची तक्रार थेट Snapchat अॅपमध्ये केली जाऊ शकते (फक्त कन्टेन्टवर दाबा आणि धरून ठेवा); तुम्ही आमच्या सपोर्ट साइटद्वारे कन्टेन्ट आणि खात्यांची तक्रारसुद्धा करू शकता (फक्त एक लहान वेबफॉर्म)
तक्रार करणे गोपनीयआहे: आम्ही Snapchatters ना त्यांची तक्रार कोणी केली ते सांगणार नाही.
तक्रारी महत्त्वाच्या आहेत: Snapchatters च्या अनुभवांमध्ये सुधारणा करण्यासाठी, आमच्या सुरक्षा टीम्स, ज्या अहोरात्र आणि जगभर कार्यरत आहेत त्यांच्याकडून पुनरावलोकन केले जाते आणि कारवाई केली जाते. बहुतांश घटनांमध्ये आमची पथके तक्रारींवर दोन तासांना कारवाई करतात.
अंमलबजावणी भिन्न असू शकते: कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वे किंवा सेवा नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकारानुसार, अंमलबजावणी कारवाई इशारा देण्यापासून ते खाते नष्ट करण्यापर्यंत कुठलीही असू शकते. (Snapchat ची कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वे किंवा सेवा अटींचे उल्लंघन न करणारे खाते आढळले तेव्हा कुठलीही कारवाई केली गेली नाही. )
आम्ही नेहमी सुधारणा करण्याच्या पद्धतींचा शोध घेत असतो आणि आम्ही तुमच्या अभिप्रायाचे आणि सल्ल्याचे स्वागत करतो. आमच्या सपोर्ट साइटचा वापर करून तुमच्या विचार मोकळेपणाने आमच्याबरोबर शेअर करा.
सुरक्षित इंटरनेट डे 2022 साजरा करण्यासाठी आम्ही सर्व Snapchatters ना आमची कम्युनिटी मार्गदर्शक तत्त्वे आणि सेवा अटींचे पुनरावलोकन करण्याची सूचना करतो, स्वीकारार्ह कन्टेन्ट आणि आचरणामध्ये सुधारणा करण्यासाठी. आम्ही एक नवीन अहवाल फॅक्ट शीटसुद्धा तयार केले आहे ज्यामध्ये उपयुक्त FAQ चा समावेश आहे, आणि आम्ही तक्रार करण्याविषयीचा अलीकडचा "सुरक्षितता Snapshot" एपिसोड अपडेट केला आहे. सुरक्षितता Snapshot एक डिस्कव्हर चॅनेल आहे ज्याचे सदस्यत्व Snapchatters मौजमजेसाठी आणि माहितीपूर्ण सुरक्षिततेसाठी तसेच गोपनीयतेशी संबंधित कन्टेन्टसाठी घेऊ शकतात. SID 2022 ला चिन्हांकित करण्यासाठीच्या काही नवीन मनोरंजनाकरिता, आमचे नवीन जागतिक फिल्टर पाहा, आणि येत्या महिन्यात आमच्या इन-अॅप रिपोर्टिंग वैशिष्ट्यांमधील अतिरिक्त सुधारणा पहा.
पालकांसाठी नवीन स्त्रोत
अखेरीस, आम्हाला एक नवीन स्रोत ठळकपणे दाखवायचा आहे,जो आम्ही आईवडील आणि काळजीवाहकांसाठी सादर करत आहोत. माइंडइप वरील आमच्या भागीदारांच्या सहकार्याने : द गोल्डी हॉन फाऊंडेशन, आम्हाला एक नवीन डिजिटल पालकत्व अभ्यासक्रम "डिजिटल वेल-बिइंग बेसिक्स" शेअर करण्यास आनंद होतो आहे, जो आईवडिलांना आणि काळजीवाहकांना किशोरवयीन मुलांमध्ये निरोगी डिजिटल सवयींना आधार देण्यासाठी आणि सशक्त करण्यासाठीच्या मोड्युल्सची मालिका दाखवतो.
येत्या महिन्यात आमची नवीन सुरक्षितता आणि डिजिटल कल्याण कामे अधिक सामायिक करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दरम्यान, स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी या सुरक्षित इंटरनेट दिवसाच्या प्रसंगी किमान एक गोष्ट करण्याचा विचार करा. तक्रार करण्यासाठी वैयक्तिक संकल्प करणे ही एक उत्तम सुरुवात असेल.
- जॅकलीन ब्युशेर, Snap च्या प्लॅटफॉर्म सुरक्षिततेचे जागतिक प्रमुख