Snap Values

2024 च्या निवडणुकांसाठी नियोजन

23 जानेवारी, 2024

Snap वर, आमचा नेहमीच असा विश्वास आहे की, नागरी सहभाग हा आत्म-अभिव्यक्तीच्या सगळ्यात शक्तिशाली प्रकारांपैकी एक प्रकार आहे. लोकांना स्वतःला अभिव्यक्त करण्यात मदत करणारे आणि नवीन तसेच प्रथमच मतदारांपर्यंत पोहोचण्यास मदत करणारे एक व्यासपीठ म्हणून आम्ही आमच्या समुदायाला बातम्या आणि जागतिक घडामोडींबद्दल अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळविण्यात मदत करणे ज्यामध्ये ते त्यांच्या स्थानिक निवडणुकांमध्ये कुठे आणि कसे मतदान करू शकतात या गोष्टीला प्राधान्य देतो. 2024 मध्ये ५० पेक्षा अधिक देशांमध्ये निवडणूका लढल्या जाणार आहेत, आगामी निवडणुकांमध्ये सर्व संबंधित घडामोडी तसेच चुकीची माहिती, राजकीय जाहिरात यांवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा तज्ञांसह आमची दीर्घकालीन निवडणूक अखंडता टीम पुन्हा एकदा एकत्रित करीत आहोत. त्यांच्या महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त, आम्ही या वर्षीच्या निवडणुकीसाठी आमच्या योजना शेअर करीत आहोत.

चुकीच्या माहितीचा प्रसार थांबविण्यासाठी तयार केलेले आहे

आमच्या सुरुवातीच्या काळापासून आमच्या संस्थापकांनी Snapchat ची रचना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पासून खूप वेगळी केलेली आहे. Snapchat अंतहीन, अप्रत्याशित मजकूर फीडसाठी उघडत नाही आणि ते लोकांना लाइव्ह स्ट्रीमिंग करण्याची परवानगी देत नाही. आम्ही आमच्या अल्गोरिदमला चुकीच्या माहितीच्या समर्थनासाठी प्रोग्राम करीत नाही आणि आम्ही गटांची शिफारस करत नाही. त्याऐवजी, आम्ही हा मजकूर मोठ्या वर्गाच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याच्या आधी नियंत्रित करतो आणि आम्ही जगभरातील विश्वसनीय मीडिया भागीदारांकडून बातम्या दाखवितो जसे यूएस मधील The Wall Street Journal ते फ्रान्समधील Le Monde ते भारतातील Times Now.

आमची सामुदायिक दिशानिर्देश, जी Snapchat खात्यांवर समान पद्धतीने लागू होतात, त्यांनी चुकीची माहिती पसरविण्यास आणि डीपफेक सारखी हेतुपुरस्सर दिशाभूल करणारा मजकूर — ज्या मजकुरामुळे निवडणुकांच्या अखंडतेला हानी पोहोचत आहे ती नेहमीच प्रतिबंधित केलेली आहे. आमच्याकडे कोणत्याही मजकुरासाठी आणखी उच्च मानके आहेत जे आम्ही अॅपच्या त्या भागांमध्ये वाढवू जिथे स्नॅपचॅटर्स सार्वजनिक मजकुर पाहू शकतात. जसजसे तंत्रज्ञान विकसित झाले आहे तसे आम्ही आमची धोरणे सर्व मजकुर स्वरूपणांसाठी अद्ययावत केलेली आहेत — त्यामुळे ती मानव निर्मित किंवा कृत्रिम बिद्धीमत्तेद्वारे निर्माण केलेला मजकुर असो. आम्हाला या प्रकारचा मजकुर सक्रियपणे आढळल्यास किंवा तो आम्हाला कळविल्यास आम्ही तो लगेचच काढून टाकतो — Snapchat किंवा इतर प्लॅटफॉर्मवर पसरण्याची त्याची क्षमता आणखी कमी करतो.

गेली अनेक वर्षे आमच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म डिझाइन करण्याच्या निर्णयांमुळे आम्हाला Snapchat ला खोट्या बातम्या आणि कट सिद्धांत मोठ्या प्रमाणावर सर्रास चालतात असे ठिकाण बनण्यापासून संरक्षण करण्यास मदत केली आहे. उदाहरणार्थ, 2022 मधील शेवटच्या यूएस मध्यवर्ती निवडणुकीदरम्यान, आमच्या कार्यसंघांनी साधारण एका तासाच्या आत कारवाई करून जागतिक स्तरावर फक्त 1,000 पेक्षा जास्त खोट्या माहिती काढून टाकल्या होत्या. 2024 पर्यंत हे खंड शक्य तितके कमी ठेवण्याचे आमचे ध्येय आहे.

राजकीय जाहिरातींसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाय

आम्ही राजकीय जाहिरातींसाठी एक अद्वितीय दृष्टिकोन देखील स्वीकारलेला आहे ज्यामध्ये निवडणूक हस्तक्षेप आणि चुकीची माहिती पसरविण्यापासून संरक्षण यांचा समावेश आहे. आम्ही प्रत्येक राजकीय जाहिरातींवर मानवी पुनर्वलोकनाचा वापर करतो आणि पारदर्शकता तसेच अचूकतेसाठीआमच्या मानकांची पूर्तता करत आहेत याची खात्री करण्यासाठी स्वतंत्र, पक्षविरहित तथ्ये तपासणाऱ्या संस्थांबरोबर आम्ही काम करतो. आमच्या पडताळणी प्रक्रियेमध्ये फसव्या प्रतिमा किंवा मजकुर तयार करणाऱ्या AI च्या कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या वापराची सखोल तपासणी करणे यांचा समावेश आहे.

जाहिरात सुरु राहण्याची मंजुरी मिळविण्यासाठी या जाहिरातीसाठी कोणी पैसे दिलेले आहेत हे स्पष्ट करणे आवश्यक आहे आणि आम्ही परकीय सरकार किंवा निवडणूक होत असलेल्या देशाच्या बाहेर कोणतीही व्यक्ती किंवा संस्थाना जाहिरातींसाठी पैसे देण्याची परवानगी देत नाही. राजकीय जाहिरातींची लायब्ररी चालविणे आणि ती कायम ठेवण्यासाठी कोणत्या राजकीय जाहिराती मंजूर केलेल्या आहेत हे पाहणे लोकांच्या हिताचे आहे यावर आमचा ठाम विश्वास आहे.

Snapchat हे जबाबदार, अचूक आणि उपयुक्त बातम्या तसेच माहितीसाठी असलेली जागा आहे याची खात्री देण्यासाठी आम्ही नेहमीच सतर्क राहू. आम्ही आमच्या समुदायाला त्यांच्या स्थानिक निवडणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी सक्षम बनविण्याचे प्रयत्न चालू ठेवू आणि येत्या महिन्यांमध्ये स्नॅपचॅटर्सना मतदान कारण्यासाठी नोंदणी करण्यात मदत कारण्यासाटी आम्ही आमच्या योजनांबद्दलचा अधिक तपशील शेअर करू.

बातम्यांकडे परत