इव्हान स्पीगलची लिखित सिनेट काँग्रेसनल साक्ष

31 जानेवारी 2024

आज आमचे सह-संस्थापक आणि सीईओ इव्हान स्पिगल हे युनायटेड स्टेट्स सेनेटच्या न्याय समितीसमोर साक्ष देण्यासाठी इतर तांत्रिक प्लॅटफॉर्मवर सहभागी होतील. खाली दिलेल्या समितीला आधीच सादर केल्याप्रमाणे तुम्ही इव्हानची संपूर्ण लिखित साक्ष वाचू शकता.

***

अध्यक्ष डर्बीन, रँकिंग सदस्य ग्रॅहम आणि समितीचे सदस्य हे Snapchat वर तरुणांचे संरक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांबद्दल तुम्हाला अपडेट करण्यासाठी आज मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. मी इव्हान स्पीगेल Snap चा सह-संस्थापक आणि सीईओ आहे.  आमची सेवा Snapchat ही त्यांचे मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी 100 दशलक्ष अमिरेकी नागरिक ज्यामध्ये 20 दशलक्ष किशोरवयीन मुलांसह वापरात आहेत. आमच्या समुदायाला सुरक्षित ठेवण्याची आमची मोठी जबाबदारी आहे.

आम्ही हे जाणतो की Snapchat चा मोठ्या प्रमाणावर आणि व्यापक वापराचा असा अर्थ आहे की, वाईट कलाकार हे आमच्या सेवेचा गैरवापर करण्याचा आणि आमच्या समुदायाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच आम्ही आमच्या सुरक्षा साधनांमध्ये सतत सुधारणा करत आहोत आणि सतत निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून आमच्या समुदायाचे संरक्षण करण्यासाठी गुंतवणूक करत आहोत. स्नॅपचॅटर्सचे संरक्षण करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे आणि व्यवसायासाठी आवश्यक आहे. आम्ही ज्या सर्वात मोठ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी काम करत आहोत त्याबद्दल मला अधिक शेअर करायचे आहे, पण प्रथम मला आमच्या सेवेबद्दल थोडी पार्श्वभूमी द्यायची आहे कारण समितीसमोर येण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.

माझे सह-संस्थापक बॉबी मर्फी आणि मी प्रथम 2011 मध्ये पहिल्यांदा Snapchat तयार केले तेव्हा आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते. आम्ही सोशल मीडियासह वाढलो आणि यामुळे आम्हाला वाईट वाटत होते की ही – एक सार्वजनिक, कायमस्वरूपी, सतत मतं प्रदर्शित करणारी लोकप्रियतेने भरलेली स्पर्धा आहे. सोशल मीडिया हा परिपूर्ण चित्रांसाठी होता, रोजच्या लहान लहान गोष्टींपेक्षा आमचा खरी मैत्री मजबूत करण्यावर जास्त विश्वास आहे.

आम्ही Snapchat ची निर्मिती ही मित्र आणि कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी, क्षण शेअर करण्यासाठी आणि व्यक्ती प्रत्यक्षात दूर असल्या तरीही त्यांना एकत्र येण्याचा अनुभव देण्यासाठी तयार केले आहे. सरासरी पाहता लोकं Snapchat वर त्यांच्या मित्रांशी बोलत असतात. आम्ही Snapchat ला कॅमेरामध्ये उघडण्यासाठी, सामग्री फीड ऐवजी निष्क्रिय वापराऐवजी सर्जनशीलतेला प्रोत्साहित देण्यासाठी तयार केलेले आहे. जेव्हा लोकं त्यांची गोष्ट Snapchat वर मित्रांसह शेअर करतात तेव्हा सार्वजनिक पसंती किंवा टिप्पण्या नसतात. 

तात्कालिकता आत्मसात करून आणि आपोआप घडणाऱ्या कृतीनुसार संदेश हटवून आम्ही Snapchat ला फोन किंवा कॉल करून किंवा समोरासमोर संभाषणाची गंमत जी कायम रेकॉर्ड किंवा जतन केली जात नाही हे स्पष्ट करतो. यामुळे लाखो अमेरिकन लोकांना स्वतःला व्यक्त करण्यात आणि त्यांना त्यांच्या मित्र आणि कुटुंबियांसह खरोखर कसे वाटते ते शेअर करण्यात अधिक सोयीस्कर वाटण्यास मदत झालेली आहे. जेव्हा लोकं Snapchat साठी साईन अप करतात तेव्हा आम्ही त्यांना हे स्पष्ट करतो की, ही संभाषणे आपोआप घडणाऱ्या कृतीनुसार काढून टाकली जात असली तरी प्राप्तकर्त्यांद्वारे संदेश सहजरित्या सेव्ह केले जाऊ शकतात किंवा त्यांचे स्क्रिनशॉट घेतले जाऊ शकतात.

आम्ही नवीन वैशिष्ट्ये तयार केल्यानंतर आमच्या समुदायाला चांगली सेवा देण्यासाठी आणि Snapchat सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी आम्ही व्यवसाय ट्रेड-ऑफ करतो. उदाहरणार्थ, जेव्हा आम्ही आमची सामग्री सेवा तयार केली त्यावेळेस हानिकारक सामग्रीचा प्रसार थांबविण्यात मदत करण्यासाठी आम्ही सामग्री मोठयाप्रमाणावर पसरण्यापूर्वी ते सक्रियपणे नियंत्रण करण्याचा निर्णय घेतला. आम्ही मीडिया प्रकाशकांना आणि निर्मात्यांना आमच्या कमाईचा एक वाटा देखील देतो ज्यामुळे त्यांना मनोरंजक आणि आमच्या सामग्री मार्गदर्शक तत्वांशी सुसंगत सामग्री तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते.

आम्ही आमच्या सेवांची रचना अशी केलेली आहे की त्यामध्ये मित्रांमधील संवादाची निवड करणे आवश्यक आहे म्हणजे कोणाशी संवाद साधायचा आहे हे लोकांना सक्रियपणे निवडावे लागेल, टेक्स्ट मेसेजच्या विरुद्ध जेथे कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडे त्यांचा फोन नंबर असल्यास ते एखाद्याला संदेश पाठवू शकतात. Snapchat वर मित्रांच्या याद्या खाजगी असतात ज्यामुळे केवळ सामाजिक दबाव कमी होत नाही तर एखाद्या व्यक्तीचे मित्र Snapchat वर शोधण्याची भक्षकांची क्षमता देखील मर्यादित होते.

Snapchat सर्वांसाठी सुरक्षित असावे अशी आमची इच्छा आहे आणि अनावश्यक संपर्क टाळण्यासाठी आणि वयानुसार अनुभव देण्यासाठी आम्ही अल्पवयीन मुलांना अतिरिक्त संरक्षण प्रदान करतो. Snapchat चे मुलभूत "माझ्याशी संपर्क साधा" हे सेटिंग्ज फक्त सर्व खात्यांसाठी मित्र आणि फोन कॉन्टॅक्ट्ससाठी सेट केलेले आहेत आणि त्याचा विस्तार केला जाऊ शकत नाही. जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीला ते परस्पर मित्र शेअर करत नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून मित्र विनंती मिळाल्यानंतर ते त्यांच्या ओळखीचे कोणी आहे का याची खात्री करण्यासाठी त्यांची संवाद सुरु करण्यापूर्वी आम्ही एक चेतावणी देतो. परिणामी, Snapchat वर अल्पवयीन मुलांकडून प्राप्त झालेल्या सुमारे 90% मित्र विनंत्या या किमान एक परस्पर मित्र असलेल्या व्यक्तीकडून येतात. लोकांना आधी ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीने संपर्क साधणे शक्य तेवढे कठीण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.

आम्ही स्नॅपचॅटर्सना अनावश्यक संपर्क किंवा उल्लंघन करणाऱ्या सामग्रीची तक्रार करणे/अहवाल देण्यास प्रोत्साहित करतो आणि आक्षेपार्ह वापरकर्त्याचे खाते ब्लॉक करतो. ज्या लोकांकडे Snapchat खाते नाही पण त्यांना तक्रार करायची आहे/अहवाल द्यायचा आहे त्यांच्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर अहवाल साधने देखील प्रदान करतो. सर्व अहवाल गोपनीय आहेत आणि आमचा विश्वास आणि सुरक्षा संघ प्रत्येक अहवालाचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि आमच्या अटींची अंमलबजावणी करण्यासाठी जगभरात दररोज 24 तास, आठवड्याचे सातही दिवस काम करतो.

जेव्हा आम्ही बेकायदेशीर किंवा संभाव्य हानीकारक सामग्रीवर कारवाई करतो, तेव्हा आम्ही विस्तारित कालावधीसाठी पुरावे देखील राखून ठेवतो, जे आम्हाला कायद्याची अंमलबजावणी करण्यास आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्यात मदत करण्यास समर्थन देते. मृत्यूचा धोका किंवा गंभीर शारीरिक दुखापत यांचा समावेश असलेली कोणतीही सामग्री कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सक्रियपणे पुढाकार घेतो आणि विशेषतः ३० मिनिटांच्या आत आणीबाणीच्या डेटा प्रकटीकरण/प्रकटन विनंत्यांना प्रतिसाद देतो. Snapchat चा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारांना न्यायालयासमोर आणता यावे अशी आमची इच्छा आहे.

आमच्या समुदायासाठी तीन मोठे धोके आहेत जे आम्ही आमच्या सेवांपासून दूर करण्यासाठी काम करत आहोत: खंडणी, बाल लैंगिक शोषण सामग्रीचे वितरण आणि बेकायदेशीर औषधे.

पहिली गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या प्रेरित सेक्सटॉर्शनमध्ये वाढ झालेली आहे, हा ब्लॅकमेल करण्याचा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये गुन्हेगार प्रेमाची संभाव्य आवड दाखवतात आणि पीडितांना तडजोड करणाऱ्या प्रतिमा पाठवण्यास भाग पडतात. बहुतेक वेळा भेटकार्डच्या स्वरूपात जिथे फोटो काढले जाऊ शकतात आणि चॅटद्वारे शेअर केले जाऊ शकतात अशा मार्गाने ही वाईट प्रवृत्तीची माणसे नंतर प्रतिमा प्रसारित करण्याची धमकी देतात आणि पेमेंट देण्याची मागणी करतात. यापैकी बऱ्याच प्रकरणांमध्ये युनायटेड स्टेट्सच्या बाहेर असलेल्या लबाड माणसांचा समावेश असतो ज्यामुळे कायदेशीर प्रक्रियेद्वारे अंमलबजावणी करणे अधिक आव्हानात्मक होते. 

या वाढत्या संकटाच्या प्रतिसादात आम्ही आमच्या सेवांवर या वाईट प्रवृत्तीच्या माणसांचा सक्रियपणे शोध घेण्यासाठी आणि संभाषण सुरू करण्यापूर्वी हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यासाठी नवीन साधने विकसित केलेली आहेत. जेव्हा आमच्या समुदायाद्वारे आम्हाला छळ किंवा लैंगिक सामग्रीची तक्रार केली जाते तेव्हा आमचा कार्यसंघ त्वरीत काम करतो, आणि सहसा 15 मिनिटांत कारवाई करतो. 

दुसरे म्हणजे आम्ही याप्रकारच्या गुन्हेगारांना देखील ओळखतो जे आमच्या सेवांवर अत्याचार करणाऱ्या प्रतिमा आणि व्हिडिओ शेअर करून लैंगिक शोषण झालेल्या मुलांचा पुन्हा बळी घेण्याचा प्रयत्न करतात. आम्ही ज्ञात बाल लैंगिक शोषण सामग्रीसाठी Snapchat वर प्रतिमा आणि व्हिडीओ अपलोड करण्यापूर्वी स्कॅन करतो आणि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन या संस्थेकडे त्याची तक्रार करतो. 2023 मध्ये आम्ही 690,000 अहवाल तयार केले ज्यामुळे 1,000 पेक्षा जास्त व्यक्तींना अटक करण्यात आली. ज्ञात बाल लैंगिक शोषण प्रतिमा अपलोड करण्यापासून आम्हाला प्रतिबंधित करतील अशा प्रकारच्या एन्क्रिप्शनची अंमलबजावणी करण्याची आम्ही अपेक्षा करत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे सध्या चालू असलेली आणि विनाशकारी फेनेटाइल ही महामारी आहे ज्याने गेल्या वर्षी 100,000 पेक्षा जास्त अमेरिकन लोकांचा बळी घेतला आहे. आम्ही आमच्या सेवेमधून औषध विक्रेते आणि औषध संबंधित सामग्रीकाढून टाकण्याचा निर्धार केला आहे. आम्ही बेकायदेशीर औषध सामग्री आमच्या सेवा सक्रियपणे स्कॅन करतो, औषध विक्रेत्यांची खाती अक्षम करतो आणि त्यांच्या उपकरणांना आमच्या सेवेत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो, पुरावे जतन करतो आणि औषधे अंमलबजावणी प्रशासनासह कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी संदर्भ देतो. 2023 साली आम्ही औषध संबंधित 2.2 दशलक्ष पेक्षा जास्त सामग्री काढून टाकलेली आहे आणि 705,000 संबंधित खाती अक्षम केलेली आहेत आणि त्या खात्यांशी संबंधित उपकरणांना Snapchat वापरण्यापासून अवरोधित केलेले आहे.

आम्ही औषध संबंधित शोध संज्ञा ब्लॉक करतो आणि औषधांचा शोध घेणाऱ्या लोकांना आमच्या सेवेवरील शैक्षणिक सामग्रीवर पुनर्निर्देशित करतो. फेनेटाइल हा एक विचित्र धोका आहे कारण ते अविश्वसनीयरित्या प्राणघातक आहे आणि रस्त्यावर सहज मिळणाऱ्या जवळजवळ सर्व प्रकारच्या औषध आणि बनावट औषधांना जोडते. म्हणूनच हे शिक्षण खूप महत्वाचे आहे आणि आम्ही सार्वजनिक जागरूकता मोहिमांमध्ये गुंतवणूक केलेली आहे जसे की, वन पिल कॅन किल, याला Snapchat वर 260 दशलक्ष वेळा पाहिले गेले आहे आणि आमच्या समुदायाला बनावट गोळ्यांच्या धोक्यांबद्दल शिक्षित करण्यासाठी फेनेटाइलवर जाहिरात परिषदेची महत्वाची भूमिका आहे.

iOS आणि Android ऑपरेटिंग सिस्टमचा भाग म्हणून उपलब्ध असलेल्या पालक नियंत्रण सेवेव्यतिरिक्त आम्ही पालकांना त्यांची किशोरवयीन मुले Snapchat कसे वापरतात या पद्धतीवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक साधने देऊन सक्षम बनविण्याचे काम केलेले आहे. आमची सेवा वापरून पालक त्यांची किशोरवयीन मुले ज्या व्यक्तींशी संवाद साधतात त्यांची सूची पाहण्यासाठी कौटुंबिक केंद्र वापरू शकतात. हे पालक त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या क्रियांचे वास्तविक जगात निरीक्षण करू इच्छितात असे आम्हाला वाटते – जिथे पालकांना हे जाणून घ्यायचे असते की, त्यांची किशोरवयीन मुले कोणाबरोबर वेळ घालवतात पण त्याकरिता प्रत्येक खाजगी संभाषण ऐकण्याची आवश्यकता नसते. कौटुंबिक केंद्र पालकांना गोपनीयता सेटिंग्जचे पुनरावलोकन करण्याची आणि सामग्री नियंत्रण सेट करण्याची परवानगी देते.

मला आशा आहे की ही सुनावणी मुलांचा ऑनलाइन सुरक्षा कायदा आणि कूपर डेव्हिस कायदा यासारख्या महत्त्वाच्या कायद्यांना पुढे जाण्याची संधी देते. आम्ही या कायद्याचे केवळ बोलून समर्थन करतो असे नाही तर कृतीमध्ये देखील समर्थन करतो आणि आम्ही आमच्या सेवा औपचारिक, कायदेशीर दायित्वे होण्यापूर्वी कायदेशीर आवश्यकतांनुसार असतील याची खात्री करण्यासाठी हे काम केलेले आहे. यामध्ये केवळ किशोरवयीन मुलांशी फक्त मित्र आणि कॉन्टॅक्ट्स मधून कोण संवाद साधू शकतो यावर मर्यादा घालणे, अॅपमधील पालकांसाठी असलेली साधने प्रदान करणे, हानिकारक सामग्री सक्रियपणे ओळखणे आणि ती काढून टाकणे आणि कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्राणघातक औषध सामग्रीचा संदर्भ देणे यांचा समावेश आहे. आम्ही स्टॉप CSAM कायद्याच्या समितीसह काम सुरू ठेवणार आहोत जे ऑनलाइन सेवांमधून बाल लैंगिक शोषण निर्मूलनाच्या दिशेने अर्थपूर्ण प्रगती करीत आहे असे आम्हाला वाटते.

आजच्या अनेक सर्वात मोठ्या आणि सर्वात यशस्वी इंटरनेट कंपन्यांची सुरवात युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे झालेली आहे आणि आपण केवळ तांत्रिक नवकल्पनाच नाही तर स्मार्ट नियमनातही याचे नेतृत्व केले पाहिजे. म्हणूनच आम्ही एक व्यापक सांघिक गोपनीयता कायद्याचे समर्थन करतो जो सर्व अमेरिकन लोकांच्या डेटा गोपनीयतेचे संरक्षण करेल आणि सर्व ऑनलाइन सेवांसाठी सातत्यपूर्ण गोपनीयता मानके तयार करेल.

मी या संधीचा लाभ घेऊ इच्छितो ज्या सर्व अविश्वसनीय भागीदार आणि सहकाऱ्यांसह आम्ही उद्योगात, सरकारी सेवांमध्ये काम करतो आणि विशेषतः तरुणांना सुरक्षित ठेवण्याचे आमचे ध्येय सामायिक करणाऱ्या ना-नफा आणि सेवाभावी संस्थासह शेअर करून त्यांचे मनापासून कौतुक करतो. आम्ही विशेषतः कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांचे आणि प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांचे आभारी आहोत जे या प्रयत्नांसाठी महत्वाचे आहेत. संक्षिप्ततेच्या दृष्टिकोनातून आणि एखाद्याला यामधून बाहेत पडायचे आहे या भीतीने मी प्रत्येकाची वैयक्तिकरित्या यादी करणार नाही, परंतु कृपया आमचे मनापासून आभार आणि आमची आत्यंतिक कृतज्ञता यांचा स्वीकार करा.

आम्ही आमच्या समुदायाकडून सातत्याने हे ऐकतो आहे की, Snapchat चा वापर केल्याने त्यांना आनंद होतो आणि आम्हाला माहित आहे की मित्र आणि कुटुंबियांशी नातेसंबंध हे मानसिक आरोग्य तसेच शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. आम्ही नुकतीच शिकागो विद्यापीठातील राष्ट्रीय मत संशोधन केंद्राकडून संशोधन सुरु केले आहे ज्यामध्ये असे आढळून आलेले आहे की, Snapchat वापरणारे हे स्नॅपचॅटर्स नसलेल्यांपेक्षा त्यांच्या मित्रांच्या आणि कुटुंबातील नातेसंबंधांच्या गुणवत्तेबद्दल अधिक समाधानी आहेत. संपूर्ण जगावर सकारात्मक प्रभाव पडण्याची आम्ही मनापासून इच्छा आहे जी दररोज आमच्या सेवेचा वापर सुरक्षित आणि निरोगी पद्धतीने केला जातो हे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देते. 

मुळात आमचा असा विश्वास आहे की ऑनलाइन संवाद हा ऑफलाइन संवादापेक्षा सुरक्षित असणे महत्वाचे आहे. आम्ही हे जाणतो की, ऑनलाइन सेवांचा वापर करताना त्यामधील सर्व जोखीम दूर करणे जवळजवळ अशक्य आहे, आम्ही Snapchat समुदायाच्या संरक्षणासाठी आमची जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार केला आहे. हे तरुण जे आपल्या देशाच्या भविष्याचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे.

धन्यवाद.

बातम्यांकडे परत