युरोप आणि यूकेमध्ये आमची जाहिरात अपडेट करत आहे

24 जुलै 2023

Snapchat हे अनेक तरुण लोकांसाठी संवादाचे प्रमुख व्यासपीठ आहे आणि आम्ही आमच्या तरुण कम्युनिटीसाठी आमची जबाबदारी गांभीर्याने घेतो. आम्ही आमचा प्लॅटफॉर्म कसा चालवतो यावर गोपनीयता, सुरक्षितता आणि पारदर्शकता नेहमीच महत्त्वाची असते आणि आमच्याकडे किशोरवयीन स्नॅपचॅटर चे संरक्षण करण्यासाठी आधीच अनेक सेफगार्ड आहेत.

14 ऑगस्टपासून, युरोपियन डिजिटल सर्व्हिसेस ऍक्ट (DSA) आणि संबंधित यूके नियमांचे पालन करण्याच्या आमच्या प्रोग्रामचा एक भाग म्हणून, आम्ही EU आणि UK मध्ये 18 वर्षांखालील स्नॅपचॅटरला जाहिराती दाखवण्याच्या पद्धतीमध्ये बदल लागू करणार आहोत. परिणामी, जाहिरातदारांसाठी सर्वाधिक टार्गेटिंग आणि ऑप्टिमायझेशन टूल्स या किशोरवयीन स्नॅपचॅटर साठी जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी उपलब्ध राहणार नाहीत. हे बदल आमच्या प्लॅटफॉर्मवर मुलांची सुरक्षा आणि गोपनीयतेसाठी आमच्या सतत वचनबद्धतेचा भाग आहेत.

आम्ही EU आणि UK मधील स्नॅपचॅटर 18+ ला त्यांच्या वैयक्तिकृत Snapchat जाहिरात अनुभवावर पारदर्शकता आणि नियंत्रणाची नवीन लेव्हल ऑफर करणे देखील सुरू करू. जाहिरातीवरील “मी ही जाहिरात का पाहत आहे” प्रकटीकरणावर टॅप केल्याने ती विशिष्ट जाहिरात त्यांना का दाखवली गेली याचे अधिक तपशील आणि इनसाईट मिळेल आणि हे स्नॅपचॅटर त्यांना दाखवलेल्या जाहिरातींचे वैयक्तिकरण नियंत्रित करण्यास देखील सक्षम असतील. तसेच, EU मधील सर्व स्नॅपचॅटरना लवकरच त्यांना दिसणार्‍या ऑरगॅनिक कंटेंटचे वैयक्तिकरण नियंत्रित करण्याचा पर्याय असेल.

याव्यतिरिक्त, आम्ही EU मध्ये दर्शविल्या जाणार्‍या जाहिरातींसाठी एक पारदर्शकता केंद्र तयार करत आहोत जे कॅम्पेनची तारीख आणि जाहिरातदारांनुसार शोधण्यायोग्य जाहिरात डेटामध्ये प्रवेश देईल.

गोपनीयता हा नेहमीच Snapchat चा मुख्य सिद्धांत राहिला आहे आणि या बदलांसह, आम्ही लोकांना कनेक्ट करण्यासाठी, स्वतःला दृष्य दृष्ट्या व्यक्त करण्यासाठी आणि एकत्र आनंद लुटण्यासाठी गोपनीयता-केंद्रित स्थान प्रदान करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला पुढे करत आहोत.

बातम्यांकडे परत