चुकीची माहिती पसरवण्यास प्रतिबंध करण्यासाठी आमचा दृष्टीकोन

९ ऑगस्ट २०२१

जग कोविड-19 च्या नवीन घडामोडींवर लढा देत असताना, लोकांना अचूक, विश्वासार्ह माहिती उपलब्ध आहे याची खात्री करणे हे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. खोट्या माहितीचा वेगाने होणारा प्रसार आमच्या संस्था आणि सार्वजनिक हितासाठी गंभीर धोका ठरू शकतोआणि आम्हाला खात्री आहे की आम्ही अशा क्षणात वावरत आहोत जिथे कंपन्या, संस्था आणि व्यक्ती यांनी हा धोका रोखण्यास मदत करण्याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा.
या अनुषंगाने आम्हाला असे वाटते की Snapchat वर खोट्या माहितीचा प्रसार रोखण्याची आमची दीर्घकालीन भूमिका आणि सुधारणा करण्यासाठीच्या पद्धती ज्यांवर आम्ही काम करत आहोत त्यांचा मार्गदर्शक म्हणून वापर करणे उपयोगी ठरू शकेल.
आमची भूमिका नेहमीच आमच्या प्लॅटफॉर्मच्या संरचनेपासून सुरू झाली आहे. Snapchat ची रचना, संपूर्ण अ‍ॅपवर संदेश प्रसारित करण्यापेक्षा मूलत: लोकांना त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींशी बोलण्यास मदत व्हावी म्हणून केली होती. आणि Snapchat वर आमच्या समुदायाला ज्या बातम्या आणि माहिती दिसते ती विश्वासार्ह असावी, खात्रीशीर आणि स्पष्ट स्रोतांकडून आलेली असावी ही आमची महत्त्वाची जबाबदारीआहे असे आम्हाला नेहमी वाटत आले आहे.
या मूलभूत तत्त्वांमुळे आमच्या उत्पादनांची रचना आणि धोरणात्मक निर्णय माहितीपूर्ण बनवले आहेत, कारण गेल्या काही वर्षांत Snapchat सातत्याने प्रगती करत राहिलेले आहे.
  • आमच्या अ‍ॅपमध्ये, तपासून न पाहिलेल्या कन्टेन्टला 'पसरण्याची'संधी आम्ही कधी देत नाही. Snapchat एखादे अनियंत्रित खुले न्यूजफीड देऊ करत नाही, जिथे तपासून न पाहिलेल्या व्यक्ती किंवा प्रकाशक खोटी माहिती पसरवू शकतील. आमचा कंटेंट प्लॅटफॉर्म, डिस्‍कवरमध्ये केवळ तपासून घेतलेले मिडिया प्रकाशक आणि कन्टेन्ट निर्मात्यांच्या कन्टेन्टचा समावेश केला जातो. आमचा मनोरंजन प्लॅटफॉर्म, स्पॉटलाइट वरून मोठ्या प्रमाणात कन्टेन्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ते सक्रियपणे नियंत्रित केले जाते. आम्ही ग्रुप चॅट्स ऑफर करतो, परंतु त्यांचा आकार मर्यादित असतो, ते अल्गोरिदम द्वारे शिफारस केले जात नाहीत, आणि जर तुम्ही त्या ग्रुपचे सदस्य नसाल तर आमच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ते शोधू शकत नाही.
  • आमच्या मार्गदर्शक तत्त्वांनी खोट्या माहितीचा प्रसार करण्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रतिबंध घातला आहे. आमची दोन्ही समुदाय मार्गदर्शक तत्त्वे, जी Snapchatters ना सारख्याच प्रमाणात लागू होतात, आणि आमची कन्टेन्ट मार्गदर्शक तत्त्वे, जी आमच्या डिस्कव्हर पार्टनर्सना लागू होतात, हे चुकीच्या माहितीचा प्रसार होण्यापासून रोखतात.अशी माहिती जी नुकसान करू शकते, ज्यामध्ये संशयास्पद विषय, दु:खद घटना नाकारणे, निराधार वैद्यकीय दावे किंवा नागरी प्रक्रियांची एकात्मकता कमी लेखली जाणे अशा गोष्टींचा समावेश होतो. आम्ही नियमितपणे आमच्या धोरणांचे पुनरावलोकन करतो कारण चुकीच्या माहितीचे नवनवीन प्रकार प्रचलीत होत आहेत.: उदाहरणार्थ, 2020 च्या निवडणुकींच्या आधी आम्ही आमच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नवीन बदल केले होते, हे स्पष्ट करण्यासाठी की दिशाभूल करण्याचा उद्देशअसलेले चलाखीयुक्त मिडिया -किंवा बनावटी मिडिया-यांवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे.
  • खोट्या माहितीचा समावेश असलेल्या कन्टेन्टच्या विरोधात अंमलबजावणी करण्याची आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे- आम्ही त्याला लेबल लावत नाही, ते संपूर्णपणे काढून टाकतो. आम्हाला जेव्हा आमच्या मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन करणारे कन्टेन्ट आढळते, तेव्हा ते सरळपणे काढून टाकण्याचे आमचे धोरण आहे, ज्यामुळे त्याचा व्यापकपणे प्रसार होण्याची जोखीम त्वरीत कमी होते.
  • उत्पादन विकास प्रक्रियेच्या फ्रन्ट एन्ड च्या दरम्यान सर्व नवीन वैशिष्ट्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता प्रभावाचे मूल्यांकन करतो- ज्यामध्ये गैरवापराच्या संभाव्य वाहकांची तपासणी करण्याचा समावेश आहे. प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रक्रियेदरम्यान Snapchatters आणि आमच्या वैयक्तिक वापरकर्ते आणि समाजाची सुरक्षितता, गोपनीयता आणि कल्याण यांवरील संभाव्य परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी आमच्याकडे अंतर्गत - आणि आम्हाला जर असे वाटले की सराईत नसलेल्यांसाठी चुकीची माहिती पसरविण्याचा हा एक मार्ग बनेल, तर ते कधीही सादर केले जात नाही.
  • सर्व राजकीय आणि पक्षसमर्थन करणाऱ्या जाहिरातींमधील तथ्ये तपासण्यासाठी आमच्याकडे मानवी पुनरावलोकनाचा वापर केला जातो. Snapchat वरील सर्व कन्टेन्टप्रमाणे, आम्ही आमच्या जाहिरातींमधील चुकीची माहिती आणि भ्रामक गोष्टी प्रतिबंधित करतो. निवडणुकांशी संबंधित जाहिरातींसह सर्व राजकीय जाहिराती, पक्षसमर्थनाच्या जाहिराती जारी करणे यांमध्ये “यासाठी निधी पुरवला” अशा पारदर्शक संदेशाचा समावेश असला पाहिजे जो प्रायोजक संघटनेचा खुलासा करेल. आम्ही मानवी पुनरावलोकनाचा उपयोग सर्व राजकीय जाहिरातींमधील तथ्ये तपासण्यासाठी करतो आणि आमच्या राजकीय जाहिरातींच्या संग्रहातील आमच्या पुनरावलोकनातून पार पडणाऱ्या सर्व जाहिरातींविषयीची माहिती उपलब्ध करून देतो.
  • चुकीची माहिती रोखण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांमधील पारदर्शकता वाढवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. 2020 च्या दुसऱ्या सहामाहीचा समावेश असलेला आमचा अगदी अलीकडचा पारदर्शकता अहवाल, ज्यामध्ये विविध नवीन घटकांचा समावेश होता, जागतिक स्तरावर खोट्या माहितीच्या विरोधात अंमलबजावणी करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या माहितीसह. या कालावधीत आम्ही 5,841 कन्टेन्ट्सवर आणि खोट्या माहितीवरील आमच्या धोरणांचे उल्लंघन करणाऱ्या खात्यांवर कारवाई केली --तसेच आमच्या भविष्यातील अहवालांमध्ये या उल्लंघनांचे अधिक सविस्तर तपशील देण्याची आमची योजना आहे.
आमच्या उत्पादनांच्या रचनेचे पर्याय आणि आमची धोरणे या दोन्हींच्या माध्यमातून आम्ही खोटी माहिती पसरविण्यासाठीची प्रलोभने काढून टाकण्यासाठी काम करत राहतो म्हणून, आम्ही तथ्यांवर आधारित आरोग्य व सुरक्षाविषयक माहितीचा प्रचार करण्यासाठी तज्ज्ञांशी भागीदारी करण्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केले आहे. साथीच्या आजाराच्या सुरुवातीपासून, आम्ही नियमित सुरक्षा अपडेट्स प्रकाशित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांसह सार्वजनिक आरोग्य अधिकारी आणि एजन्सीजबरोबर जवळून काम केले आहे, आणि जगभरातील आमच्या बातमी भागीदारांनी या साथीच्या आजाराचे कव्हरेज सातत्याने तयार केले आहे. या वसंत ऋतुच्या आधी, यूएस मधील तरुणांसाठी लस उपलब्ध झाल्यामुळे, आम्ही Snapchatters च्या सामान्य प्रश्नांची उत्तरे देण्यास मदत करण्यासाठी व्हाइट हाउसबरोबर नवीन प्रयत्न सुरू केले आणि जुलैमध्ये, आम्ही अशाच प्रयत्नांसाठी यूकेच्या नॅशनल हेल्थ सेवेबरोबर एकत्र काम केले.
आपल्या समुदायाला सुरक्षित आणि निरोगी राहण्यास मदत करण्यासाठी आमची भूमिका पार पाडणे ही आमच्यासाठी सतत सुरू राहणारी प्राथमिकता आहे, आणि आम्ही Snapchatters च्या प्रवेशासाठी नाविन्यपूर्ण पध्दती शोधून काढण्याचा प्रयत्न सुरू ठेवणार आहोत, खोट्या माहितीच्या महासागरापासून Snapchat संरक्षित करण्यासाठीचे आमचे प्रयत्न मजबूत करताना.
बातम्यांकडे परत