आमच्या पालकांच्या इन-अॅप साधनांचा विस्तार करणे

11 जानेवारी 2024

Snap येथे, आम्ही पालकांना Snapchat च्या किशोरवयीन मुलांच्या सुरक्षित वापरास समर्थन देण्यासाठी अतिरिक्त साधने आणि संसाधने देण्यासाठी वचनबद्ध आहोत. 

2022 मध्ये, आम्ही कौटुंबिक केंद्र सुरू केले, ज्यामध्ये पालकांच्या साधनांचा आमचा संच आहे जो त्यांची मुले Snapchat वर कोणाशी बोलत आहेत हे पाहण्याची आणि गोपनीयतेविषयीची कोणतीही चिंता तक्रार/अहवाल देणे आणि मजकूर नियंत्रणे सेट करण्याची पालकांना परवानगी देतो- यापैकी सर्व किशोरांना Snapchat वर सुरक्षित ठेवण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. 

Snapchat हे लोकांना त्यांच्या मित्रासह ऑफलाइन पद्धतीने संवाद साधण्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आलेले होते आणि कौटुंबिक केंद्र हे पालक आणि किशोरवयीन मुलांमधील वास्तविक जगातील नातेसंबंधांची गतिशीलता दाखवते, जिथे पालकांना त्यांची किशोरवयीन मुले ही कोणाबरोबर वेळ घालवत आहेत याची कल्पना असते आणि हे त्यांच्या वैयक्तिक संवादांची गोपनीयता राखत आदर करते. आम्ही कौटुंबिक केंद्र विकसित करण्यासाठी आणि नियमित आधारावर त्यांचे अभिप्राय वापरून अतिरिक्त वैशिष्ट्यांसह ते अपडेट करण्यासाठी कुटुंबे आणि ऑनलाइन सुरक्षा तज्ञांसह लक्षपूर्वक काम केले आहे.

आज, आम्ही पालकांना अधिक दृश्यता देण्यासाठी आणि ऑनलाइन सुरक्षिततेबद्दल उत्पादक संभाषणे यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी कौटुंबिक केंद्र वैशिष्ट्यांची ओळख करून देत आहोत. येत्या आठवड्यात आम्ही रोल आउट करीत आहोत:

त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या सेटिंगमध्ये दृश्यमानता: आम्ही किशोरवयीन मुलांसाठी मुख्य सुरक्षा आणि गोपनीयता सेटिंग ही आपोआप घडणारी कृती म्हणून कठोर मानके ठरवितो. आता पालक हे पाहण्यास सक्षम असतील:

  • त्यांच्या किशोरवयीन मुलांची गोष्ट सेटिंग्ज: किशोरवयीन मुलांकडे त्यांची गोष्ट त्यांच्या मित्रांसह शेअर करण्याची किंवा जवळच्या मित्रांचा आणि कुटुंबाचा एक लहान गट निवडण्याची क्षमता असते.

  • त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या संपर्क सेटिंग्ज: स्नॅपचॅटर्सना केवळ त्यांनी मित्र म्हणून जोडलेल्या व्यक्ती किंवा पर्यायाने त्यांचे फोन कॉन्टॅक्ट्सद्वारे संपर्क साधू शकतात.

  • त्यांची किशोरवयीन मुले Snap मॅप वर मित्रांसह त्यांचे स्थान शेअर करत असल्यास: Snap मॅप हे स्नॅपचॅटर्सला त्यांचे मित्र कुठे आहेत आणि ते काय करीत आहेत हे पाहण्याची, मनोरंजक ठिकाणे शोधण्याची आणि जगभरातील स्नॅपचॅटर्सद्वारे सादर केलेली सामग्री पाहण्याची अनुमती देते. स्नॅपचॅटर्सने स्थान शेअर करा यासाठी निवड करणे आवश्यक आहे – आणि फक्त त्यांचे स्थान मित्रांसह शेअर करण्याचा पर्याय आहे. 

AI साठी पालक नियंत्रण: पालक आता आमचा AI समर्थित चॅटबॉट My AI साठी त्यांच्या किशोरवयीन मुलांच्या चॅट्सला प्रतिसाद देण्याची क्षमता प्रतिबंधित करू शकतील. हे वैशिष्ट्य आधीपासून My AI मध्ये तयार केलेल्या सुरक्षिततेवरील उपायांवर आधिरीत आहे ज्यामध्ये अयोग्य किंवा हानीकारक प्रतिसादांपासून संरक्षण, स्नॅपचॅटर्स वारंवार सेवेचा गैरवापर करत असल्यास तात्पुरता वापर प्रतिबंध आणि वय जागरूकता यांचा समावेश आहे.

कौटुंबिक केंद्र वापरण्यास सुलभ: Snapchat शी अपरिचित असलेल्या पालकांसाठी आम्ही कौटुंबिक केंद्र शोधणे सोपे करत आहोत. आता पालक थेट त्यांच्या प्रोफाइलवरून किंवा पालकांच्या प्रोफाइलच्या वरच्या उजव्या कोपऱ्यांत असलेल्या सेटिंग्जमध्ये जाऊन कौटुंबिक केंद्रात प्रवेश करू शकतात. Snapchat मध्ये नवीन असणाऱ्या पालक आणि किशोरवयीन मुलांना सहजपणे कौटुंबिक केंद्र शोधण्यासाठी आणि त्यामध्ये सामील होण्यासाठी मदत करणे हे आमचे ध्येय आहे. 

आम्ही Snapchat ला आमच्या संपूर्ण समुदायासाठी एक मजेदार आणि सुरक्षित वातावरण तयार करण्यात मदत करण्यासाठी पालक आणि ऑनलाइन सुरक्षा तज्ञांकडून लक्षपूर्वक काम करणे सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत.

बातम्यांकडे परत